हुतात्मा स्मारक येथे पार पडला समारंभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- ओबीसी समाजाच्या हक्कासाठी व सन्मानासाठी तसेच ओबीसी समाजावर होणारे अत्याचार व अन्याय रोखण्यासाठी तालुकास्तरीय राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी यामीणी कामडी, सचीवपदी राधा जुमडे , कोषाध्यक्ष वर्षा शेंडे , कार्याध्यक्ष पुष्पा हरणे, उपाध्यक्ष प्रज्वला गावंडे,मंजुषा ठोंबरे,सुरेखा शेंबेकर, इंदिरा कामडी यांची निवड करण्यात आली.राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली तालुका अध्यक्ष पदी वैभव ठाकरे यांची निवड करण्यात आली.तसेच सचिव दीपक लाकडे, कार्याध्यक्ष बादल बुटके यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली तालुकाध्यक्ष पदी राजकुमार माथुरकर यांची निवड करण्यात आली.सचिव पदी प्रितम वंजारी यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भावना बावणकर व जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षी बंडे यांना शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष- राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्याम लेडे कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.सतीश वारजुकर,प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे जिल्हाध्यक्षा भावना बावनकर प्रा.राम राऊत, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे तालुकाध्यक्ष पुष्पा हरणे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास कामडी, सुत्रसंचलन वर्षा शेंडे तर आभार प्रभाकर पिसे यांनी मानले.नवनियुक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.