जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- चिमूरच्या विकासामध्ये मानाचा तुरा म्हणून चिमूर नगर परिषदेची नवीन इमारत शहरातील जनतेसाठी खुली करण्यात आली. सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद चिमूरच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळा आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते संपन्न झाला.चिमूर नगर परिषद नवीन लोकार्पण सोहळाच्या अध्यक्ष स्थानी आमदार कीर्तीकुमार भांगडीया होते. नगर परिषदचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ. व्यापारी मंडळचे माजी अध्यक्ष भीमराव ठावरी. नीलम राचलवार. भाजपा तालुका अध्यक्ष राजू झाडे. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष संजय नवंघडे. व्यापारी मंडळचे अध्यक्ष प्रवीण सातपुते. नगर परिषद अधीक्षक प्रदीप रणखांब. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी प्रास्ताविक केले. नवीन इमारतीची निर्मिती कशा पद्धतीने केली. या इमारतीचे सात कोटी रुपयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तर पाच कोटी रुपयाचे काम नगर परिषद यांनी केली असे बारा कोटी रुपयाचे काम झाल्याची माहिती राहुल कंकाळ यांनी दिली.कऱ्यक्राच्या अध्यक्ष स्थनवरून मनोगत व्यक्त करताना चिमूर नगर परिषदेची नवीन इमारत चिमूरच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या इमारतीतून लोकाभिमुख. पारदर्शक. कामे व्हावीत. प्रत्येक निर्णय शहराच्या विकासाला चालना देणारा असेल असे वक्तव्य आमदार किर्तिकुमार भांगडीया यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत राहुलवार यांनी केले.