जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना. नृत्य बिजली गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम नवरात्री उत्सव निमित्त चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगना गौतमी पाटीलच नाव चर्चेत आहे तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी टीका केल्यापासून गौतमी पाटील जास्तच प्रकाश झोतात आली. नुकताच चिमूर शहरात इंदुरीकर महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि येत्या ९ ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजता ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथील मैदानात नवरात्र उत्सवानिमित्त गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. विधान परिषद आमदार अभिजित वंजारी. शिवानी वडेट्टीवार. काँग्रेस ओबीसी सेल राज्य संघटक धनराज मुंगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती चिमूर क्रांती बहुजन फौंडेशन चे अध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली. जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी गौतम पाटील यांनी केले