चिमूर तालुका काँग्रेस कार्यालय येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसनी घेतला आक्षेप
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – डान्स कलावंत गौतमी पाटीलची सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली असून जनतेसमोर डान्स ,नृत्य सादर करीत असते. त्यामुळे महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध नाट्य, डान्स कलाकार म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील गौतमी पाटील हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात. तिच्या डान्स नृत्याचा कार्यक्रम दिनांक. ९ ऑक्टोबर ला सायंकाळी ०६:०० वाजताच्या सुमारास चिमूर शहरातील ग्रामगिता महाविद्यालय बाजूला लागून असलेल्या खुल्या मैदानावर आयोजित केला असून हा कार्यक्रम काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येत असल्याची प्रसिद्धी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून होत आहे.
या कार्यक्रमांची प्रसिद्धी करीत असतांना आयोजक जरी दुसरे असले तरी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी यांची नावे येत असल्याने हा कार्यक्रम काँग्रेस ने आयोजित केला आहे असे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे.
म्हणून आज दिनांक. ०७/१०/२०२४ ला दुपारी १२ वाजता गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचा विरोध दर्शवीत केलेल्या जाहिरातीचे खंडण तालुका काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले असून या कार्यक्रमाशी तालुका काँग्रेस कमिटीचा कसलाही संबंध नाही असे विजय पाटील गावंडे यांनी परिषदेत म्हटले यावेळी उपस्थित प्रा.रामराऊत सर सहसचिव महाराष्ट्र प्रदेश सेवा दल, विजय पाटील गावंडे तालुका अध्यक्ष, गजानन बुटके तालुका महासचिव, राजेश चौधरी खासदार यांचे स्विय्य सहाय्यक, विजय डाबरे,विवेक कापसे, अविनाश अगडे,आरिफ शेख, पप्पू शेख, रामदास विटाळे, नामदेव डोहे, अक्षय लांजेवार,श्रीकांत गेडाम तालुका अध्यक्ष एन.एस.यु.वाय, राकेश सटोणे विधानसभा युथ काँग्रेस उपाध्यक्ष व आदी उपस्थित होते.
…………………………………………………………………………….
* गौतमी पाटील यांचा कार्यक्रम चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन यांनी आयोजित केला आहे. यात काँग्रेस पक्षाचा कुठलाही संबंध नाही * धनराजभाऊ मुंगले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.