Breaking News

शिशुपाल पटले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

( भंडारा ) -भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार शिशुपाल पटले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. शिशुपाल पटले विदर्भातील ज्येष्ठ नेते असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. अनेक वर्ष भाजपामध्ये घालवल्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रवेश केला.गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांचा त्यांना दांडगा अभ्यास आहे. वेळोवेळी सभागृहात किंवा आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या शासनासमोर मांडल्या आहेत.

तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार गावचे ते 1994 ते 1997 या काळामध्ये सरपंच होते. त्यानंतर 1997-1998 या कालावधीमध्ये ते भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील होते. 2000 ते 2005 या दरम्यान जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद त्यांनी भूषवले आणि 2004 ते 2009 या काळात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे ते खासदार होते. त्या नंतर त्यांनी ३ वर्षे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य व किसान प्रदेश मोर्चाचे महासचिव म्हणून संघटनात्मक जबाबदारी पार पाडली.मोठी राजकीय कारकीर्द असलेल्या शिशुपाल पटले यांची प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय नानाभाऊ पटोले यांना दिले असून भंडारा-गोंदिया जिल्हयासह राज्याचे विविध प्रश्न शासनासमोर मांडणार असल्याचे ते म्हणाले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved