अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरातील खंडोबानगर वडार गल्ली मारवाड गल्ली भारदे गल्ली खालची वेस नाईकवाडी मोहल्ला आदी भागात गेल्या काही दिवसांपासून पिवळे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे यांची तक्रार नगरपालिकेत नेमकी कोणाकडे करायची ??? याची माहिती नसल्याने व नागरिक गे पाणी वापरण्या योग्य नसल्याचे सांगत आहे आधीच शेवगावकरांना महिन्यातून तीन ते चार वेळा पाणी येते ते हि मोजकेच आणि आता ते हि पिवळे आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने महिलावर्गात चिंता व्यक्त होत आहे नेमकं पाणी वापरायचं कस ते पिण्या योग्य तर नक्कीच नाही.
हे म्हणजे असं झालं “घरच झालं थोडं आणि व्याह्याण धाडलं घोड” अशी अवस्था झाली आहे या बाबत “मी शेवगांवकर” कडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत पुण्या सारख्या शहरात अस्वच्छ पाण्यामुळे G.B.S. सारखे गंभीर आजार होत असल्याने त्याच धर्तीवर हे पिवळं पाणी परिसरातील साखरकारखान्याच्या मोल्यासिस व रसायन युक्त पाणी पैठण च्या धरणाच्या पाण्यात तर मिसळत नाही ना ??? पाणी स्वच्छ करणारी ठेकेदार कंपनी नेमकं काय काम करते ??? हि योजना महाराष्ट्र जावं प्राधिकरण M.G.P. पंचायत समिती शेवगांव चा पाणीपुरवठा विभाग पाणी स्वच्छ करणारी ठेकेदार कंपनी आणि नगरपरिषद चा पाणी पुरवठा विभाग आदी “जम्बो” सरकारी विभागाच्या सहकार्याने सुरु आहे नेमक “खराब सेप्टिक टॅंक सारखे पिवळे पाणी येण्यासाठी जबाबदार कोण” ??? विचारतोय गरीब नडलेला अडलेला शेवगांव चा नागरिक शहरात खंडीभर पुढारी आहेत मला दोन हाना पण गांव पुढारी म्हणा कुठं आहेत आता.
*ताजा कलम*
*नगरपरिषद शेवगांवच्या नवीन प्रस्तावित पाणी योजनेच्या कामाची सुरवात झाल्याने सध्या शहरातील अधिकृत सात ते आठ हजार कनेक्शन ठेऊन उर्वरित अनधिकृत कनेक्शन कट करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे शहरातील काही महाभागांकडे नोंदणीकृत एक कनेक्शन आणि प्रत्यक्षात सहा कनेक्शन जबाबदार कोण ???*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*