जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- श्रीहरी बालाजी देवस्थानचे विश्वस्त नीलम राचलवार यांनी आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या तिसऱ्यांदा विजयासाठी श्रीहरी बालाजी महाराज यांना केलेला नवस बालाजी मंदिरात पेढा तुला कार्यक्रम करून पूर्ण केला.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा निवडून आले. आमदार भांगडीया यांनी गेल्या दहा वर्षांत भरपूर प्रमाणात विकास केला.
श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दोन सभागृह.भक्त निवास तयार करण्यासाठी निधी दिला. तसेच बालाजी सागर सौंदर्यकरणचे काम सुरू होत आहे. आमदार भांगडीया तिसऱ्यांदा विजयासाठी श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नीलम राचलवार यांनी श्रीहरी बालाजी महाराज यांना नवस केला होता. आणि आमदार भांगडीया तिसऱ्यांदा निवडून आले त्या अनुषंगाने नीलम राचलवार यांनी वचनाची पूर्तता करीत आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांचा पेढे तुला कार्यक्रम केला यावेळी श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्टचे सदस्य. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.