जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी :-महामुनी बुद्ध विहार नेरी येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली . सकाळी ११ वाजता माता रमाई च्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणुन प्रज्ञाताई राजुरवाडे मॅडम , छबिला टेंभुर्णे , रत्नमाला सहारे , शालिनी साखरे , हर्षा ढवळे व विलास राऊत हे होते संचालन आनंद टेंभुर्णे प्रस्तावणा विना राऊत तर आभार प्रदर्शन सुरेंद्र ढवळे यांनी केले दुपारी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये छोट्या मुलांनी व महिलांनी भाषणे , नाच गायन केले रात्री ९ वाजता त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जिवन संघर्ष या एक पात्री नाटकाचे आयोजन केले होते .
रमाई सादर करणाऱ्या आयु . लताताई डोंगरे पुलगाव यांनी जीव ओतून रमाईच्या भुमिकेला न्याय दिला. माता रमाईच्या जिवनात पुढे काय घडणार याची सर्वांना उत्सुकता जाणवत होती. प्रसंगी सर्वांच्या डोळ्यात अश्रृ सुद्धा वाहत होते अत्यंत बोलके आणि ज्ञानात भर टाकणारे नाटक त्यांनी सादर केले नाटकाचे आयोजन महामुनी कृती सेवा समिती महामुनी बुद्ध विहार नेरी येथील पदाधिकारी व सदस्य यांनी केले होते नाटकाच्या प्रयोजनात नंदाताई राऊत व वंदाताई राऊत यांचे खुप मोठे सहकार्य लाभले.