Breaking News

चिमूर नगरीत रविवारी मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन

बि.पि.एड. कालेज येथे  सम्मेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- दु:खी , गरिब , कष्टी, अज्ञानी मानवास भगवत प्राप्तचा नीष्काम भावनेने परिचय करुण देणारे, सुखमय जिवन जगण्यास प्रेरित करणारे , अनेक वाईट व्यसन व अंध:श्रद्धा पासुन परावृत्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणी नुसार जनजागृती करिता मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन चिमुरात रविवारी १६ फेब्रुवारी ला बि.पी.एड कालेज या ठिकाणी आयोजित केले आहे.९ हजार ते १०हजार सेवकांची उपस्थिती लाभणार आहे. सकाळी ६.३० वाजता चिमुर परिसराचे मार्गदर्शक प्रभाकर कामडी यांच्या निवासस्थानी हवनकार्य पार पडणार .त्यानंतर ८ वाजता प्रभाकर कामडी यांच्या निवासस्थानापासुन शोभायात्रेला सुरुवात केली जाणार मासळ चौक–डोंगरावर चौक-नेहरू शाळा चौक- हजारे पेट्रोल पंप चौक-संविधान चौक नंतर सेवक सम्मेलन स्थळ शोभायात्रा मार्गस्थ होणार व १२ वाजता सम्मेलनाचे उद्घाटन

या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजुजी मदनकर राहणार आहे तर कार्यक्रमाचे उद्घाटक परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक वासुदेवजी पडोळे तर कार्यक्रमाचे अतिथी चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया, परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख, सचीव सुरजलाल अंबुले कोषाध्यक्ष प्रवीण जी उराडे , सहसचिव, मोरेश्वरजी गभणे,संचालक फकिराजी जिभकाटे, संचालक टिकारामजी भेंडारकर,संजयजी महाकाळकर, विठ्ठलराव क्षिरसागर, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव , तहसीलदार श्रीधर राजमाने, ठाणेदार संतोष बाकल ठाणेदार हिंगणघाट मनोज गभणे,पोलीस उपनिरीक्षक घनश्याम नवखरे,मुख्याधीकारी सौ.अर्चना वंजारी, रमेश धनजोडे,विजय झोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शक प्रभाकर कामडी करणार आहे.

भव्य सेवक सम्मेलनाचे सुत्र संचालन भुयारचे दिनेश वाणी , कवडू लोहकरे आणी सुनील धानफोले करणार आहेत.जास्तीत जास्त सेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परमात्मा एक सेवक मंडळाकडून करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वाघाने गोठ्यातील चार जनावरे केली ठार

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   मासळ परीसरातील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- …

बनावट दारूच्या विरोधात सतत च्या मालिकेनंतर एक्साईज डिपार्टमेंट ची शेवगांव शहरातील अनेक परमिट रूमवर धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved