Breaking News

शिवसेना उ.बा.ठा.गटाचे नामदार अंबादास दानवे यांची शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी घेतली भेट

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवलेल्या पैशासंदर्भात न्याय मिळावा म्हणून व या मधील प्रमुख फरार भामटा आरोपी साईनाथ कवडे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांचे पैसे परत मिळावेत या प्रमुख मागणीसाठी संभाजीनगर येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची समक्ष भेट घेऊन त्या संदर्भात लेखी निवेदन सादर केले यामध्ये गुंतवणूकदार माऊली धनवडे ,अमोल फडके ,महादेव शिंदे, नागेश निकाळजे ,विजय राजपुरे यांचा समावेश होता.

शेवगाव तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांचे फसवणूक करणारा फरार भामटा आरोपी साईनाथ कवडे व इतर आरोपीची एस. आय. टी. मार्फत चौकशी करण्यात यावी. या बाबत दिनांक 28/10/2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे (कलम बी. एन. एस. 173 च्या अंतर्गत गु. र. न. 0887 प्रमाणे दिनांक 28/10/2024 रोजी भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 406, 409 महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्था मधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम 1999 अन्वये कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही वरील सर्व फसवणूक झालेले गुंतवणूकदार प्रतीक्षा करत आहोत की या गुन्ह्या अंतर्गत नमूद केलेला फरार भामटा आरोपी साईनाथ कल्याण कवडे, त्याची सरपंच आई चंद्रकला कल्याण कवडे, वडील कल्याण गंगाधर कवडे भाऊ महेंद्र कल्याण कवडे या सर्वांना शेवगाव च्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अटक करावी परंतु अद्याप पर्यंत वरील भामटे आरोपी हे फरार असून ते पोलिसांना मिळून येत नाहीत त्यांना अद्याप पर्यंत पोलिसांनी अटक का केलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. साईनाथ कवडे व इतर आरोपींनी शेवगाव तालुका व इतर तालुक्यातुन अनेक व्यक्तींकडून ॲसिटेक सोल्युशन या कंपनीमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली.

*विशेष बाब*

*पोलिसांच्या अवती भोवती फिरणारे काही झिरो पोलीस त्याला खबरा लीक करत आहेत हे गंगाधर हि शक्तिमान असल्याची चर्चा आहे*

*सदरील आरोपी हा Instagram Whats-App Facebook वर लाईव्ह च्या माध्यमातून अनेक जणाला धमकी देतो की माझी पोलीस स्टेशनला तक्रार कराल तर तुम्हाला मी सोडणार नाही . त्याचप्रमाणे आरोपीचे लोकेशन ट्रेस होऊन देखील सुद्धा पोलीस प्रशासन या आरोपीस अटक का करत नाही . याबाबत अनेक नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले की मुख्यमंत्री मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून आरोपीची S I T मार्फत चौकशी करण्यासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन दिले.*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बनावट दारूच्या विरोधात सतत च्या मालिकेनंतर एक्साईज डिपार्टमेंट ची शेवगांव शहरातील अनेक परमिट रूमवर धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने …

चोपडा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ मासीक मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- दिनांक 16/05/2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved