जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील आंजी (पेसा) आदिवासी बहुल या गावांमध्ये शासनाने तलाठी गावात राहून लोकांचे कामे करावे यासाठी शासनाने लाख रुपये खर्च करून तलाठी कार्यालय बांधण्यात आले परंतु आंजी येथील तलाठ्यांला कार्यालयात बसण्याची एलर्जी आहे ते एकही दिवस कार्यालयात बसून काम करत नाही आहे कार्यालय धुळ खात आहे त्यामुळे आंजी व तेजणी येथील नागरिकांना कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी नाहीतर मंडळ कार्यालयात बोलवतात तेव्हा आंजी व तेजणी येथील नागरिक वयोवृद्ध महिला विद्यार्थी पायपीट करत तलाठ्यांचा शोध घेत जाते.
यामुळे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागते आंजी येथील नागरिकांनी तलाठ्यांना विचारले गावात कार्यालय असून तुम्ही का येत नाही तलाठी म्हणतात तुम्हाला जे काम असेल त्यासाठी मी ज्याठिकाणी बोलवेल तिथे यांचे मी गावात येणार नाही असे आंजी येथील नागरिकांत बोले जात आहे नागरिकांना एकच प्रश्न पडला आहे लाख रुपये खर्च करून शासनाने कार्यालय कश्यासाठी बांधले आहे तेव्हा उपविभागीय अधिकारी राळेगाव व तहसीलदार राळेगाव यांनी अश्या बेजबाबदार तलाठ्यांची बदली करावी नाहीतर आंजी येथील कार्यालयात नेहमी हजर ठेवावे अशी मागणी आंजी येथील नागरिक करीत आहे.