jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” चिमूर शहरातुन निघाला बहुसंख्य नागरिकांचा निषेध मोर्चा “
” चिमूर बंद ला व्यापारी मंडळ व नागरिकांचा १००% प्रतिसाद “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर शहरातील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याच्या निषेधार्थ चिमूर बंद व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा बंद १००% यशस्वी झाला असून शहराती बहुसंख्यांक नागरिक निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल सोशल मीडियावर आपत्तीजनक व अपमानास्पद पोस्ट केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी 8 वाजता सर्व शिवभक्त युवकांनी श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान मैदानात एकत्रित येऊन चिमूर शहर बंदला यशस्वी करण्याकरिता बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरात जनजागृती केली. सकाळी 10 वाजता श्रीहरी बालाजी देवस्थान पटांगणातून निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेऊन निषेध मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा मधे सर्व धर्मातील शिव प्रेमी सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येने निघालेल्या हा मोर्चा अतिशय शांततेत तहसील कार्यालय समोर आला. तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले.