jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamach
चिमूर शहरातील शिवभक्त आक्रमक
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर शहरातील नेताजी वॉर्ड येथील सोनू शेख या तरुणाने इंस्टाग्राम वर छत्रपती संभाजी महाराजांन बद्दल आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याने चिमूर शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. चिमूर पोलिसांनी ताबडतोब आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत लॉकअप मधे बंद केल्याने वातावरण शांत झाले.
सविस्तर वृत् असे की दिनांक ७ मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास चिमूर शहरातील नेताजी वार्डातील सोनू शेख या युवकाने इंस्टाग्राम अकाउंट वरून एका युवकाच्या पोस्ट वर छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्हिडिओ पोस्ट वर आक्षेपार्य विधान केल्याने चिमूर शहरात वातावरण तापले. शहरातील हजारो युवकांनी एकत्र येत पोलिस स्टेशन चिमूर येथे घेराव घातला. पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी तातडीने सूत्र हलवित सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांनी सापळा रचत पोलिस स्टॉपच्या मदतीने काही वेळातच आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत आरोपी सोनू शेखला पोलिस हिरासत मधे घेतले. व परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान सकल हिंदू संघटनेच्या वतीने दिनांक ९ मार्च ला चिमूर बंद चे आव्हान करण्यात आले.