jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
भर उन्हाळ्यात परीक्षेचे नियोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- इयत्ता पहिली ते नववी वार्षिक परीक्षा पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोन वेळापत्रकात बदल करून सर्व परीक्षा १२ एप्रिल पर्यंत घेण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शिक्षण आयुक्त यांचे दिनांक ५ मार्च २०२५ चे पत्रानुसार राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार संकलित मूल्यमापन चाचणी दोनचे वेळापत्रक सध्या निर्गमित केले आहे. संकलित चाचणी दोन / वार्षिक परीक्षा २५ एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश आहेत.
२५ एप्रिल २०२५ ला शेवटचा पेपर ठेवला आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसात उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे, इ. कामे चार ते पाच दिवसात होणे शक्य नाही,माध्यमिक शाळेत विषय निहाय शिक्षक असतात.एका शिक्षकाकडे किमान चार ते पाच विषयाचा कार्यभार असतो. त्यामुळे उत्तर पत्रिका चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही.मुंबई, ठाणे यांसारख्या शहरातील शाळांमधील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत मूळ गावी अथवा बाहेरगावी जातात. बस किंवा रेल्वेचे तीन महिन्यांपूर्वी आरक्षण केलेले असते.
ऐनवेळी वेळापत्रक बदलल्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार आहे.राज्यातील काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कडक ऊन,पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही.या सर्व बाबींचा विचार करुन तिसरी ते नववी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा 12 एप्रिल पूर्वी घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे यांनी दिली आहे.