jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- युवा ग्रामीण पत्रकार संघटना राळेगाव यांच्या वतीने दिनांक 25/ 3/ 2025 ला राळेगाव येथील एस डी ओ, विशाल खत्री,तहसिदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार पंचायत समिती राळेगाव यांना राळेगाव तालुक्यातील घरकुल धारकांना व विहीर बांधकाम धारकांना शासनाकडून मोफत रेती ऊपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले, शासन गोरगरीब जनतेला घरकुल देतात परंतु रेती अभावी त्या गोरगरीब जनतेचे घर बांधणी होत नाही.
पंचायत समिती लेवलवर नोटीसा देण्यात येतात की इतक्या दिवसात घर पूर्ण करा परंतु रेती नसल्यामुळे घर पूर्ण होऊ शकत नाही शासन फक्त घोषणा करतात की घरकुलधारकांना मोफत रेती मिळणार परंतु त्याची मात्र अंमलबजावणी करताना दिसत नाही.राळेगाव तालुक्यामध्ये वर्धा नदी लागून असल्याने तालुक्यामध्ये अनेक रेतीचे घाट आहे, परंतु ते लिलाव न झाल्याने सर्व अडचणी निर्माण होतानी दिसत आहे, तरी सर्व रेती घाट लिलाव करण्यात यावे अशी जनता बोलतानी दिसत आहे.
राळेगाव तालुक्यातील सर्व घरकुल धारकांना व विहीर बांधकाम धारकांना लवकरात लवकर शासनाकडून मोफत रेती ऊपलब्ध करून देण्यात यावे यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटना राळेगाव च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखेडे, कार्याध्यक्ष उमेश कांबळे, सचिव शशीम कांबळे, उपाध्यक्ष लोकेश दिवे, संघटक गोपीचंद ढाले, कोषाध्यक्ष असलम पठाण, प्रसिद्ध प्रमुख अरविंद कोडापे, सदस्य कैलास कोडापे, शंकर पंधरे,रंजत चांदेकर, जगदीश गोबाडे, सुरज ढाले, जितेंद्र खोडे, बंडु भारसकरे, महादेव टेकाम, सुरज पत्रकार हे सर्व पत्रकार हजर होते.