jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- दिनांक 26 मार्च वार बुधवार ~या बाबत सविस्तर वृत्त असे की सुसरे तालुका पाथर्डी येथील मथुराबाई मधुकर पटारे वय वर्ष 80 या एसटी बसने संभाजीनगर येथे नातेवाईकाकडे नातवासमवेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज सकाळी शेवगाव एसटी स्टँडवर सकाळी आठच्या सुमारास मढी ते संभाजीनगर पैठण आगाराच्या बस च्या मागच्या टायराखाली खाली त्यांचा सापडून मृत्यू झाला.
ही घटना शेवगाव स्टँडच्या आवारात घडली. पैठण आगाराच्या गाडीचा नंबर एम. एच. 20 बी. एल. 1162 असा आहे. शेवगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस हवालदार अरविंद चव्हाण पोलीस हवालदार आबासाहेब गोरे यांनी त्यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टम साठी पाठवला व त्यानंतर अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*