जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- स्थानिक. बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक २३ मार्च २०२५ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत दत्तक ग्राम खैरगाव देशमुख येथे आयोजीत करण्यात आले आहे. या विशेष शिबीराचे उद्घाटन दिनांक २३ मार्च २०२५ रोजी संपन्न झाले. उद्घाटन समारोहाचे अध्यक्ष जनशक्ती शिक्षण संस्था पांढरकवडा चे सहसचिव सांबारेड्डी येल्टीवार हे होते तर उद्घाटक राजेंद्रजी इंगळे तहसिलदार केव्ळापूर हे होते. तर प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. एस. खंडारे, महाविद्यालय विकास समिती सदस्य सुनिलभाऊ ठाकरे, संरपंच सौ. संगिताताई कुलसंगे, उपसरपंच विनोदभाऊ बोरतवार, सामाजिक कार्यकर्ता सतिशभाऊ ढोले, विलासभाऊ कोटनाके अध्यक्ष शाळा व्यवस्थपन समिती, ज्ञानेश्वर नैताम अध्यक्ष तंटामुक्ती समिती, त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. एम. कनाके, महीला कार्यकम अधिकारी डॉ आर.जे. महाजन, सहकार्यक्रम अधिकारी डॉ पी.जी. जोशी आणि प्रा.एन जे टेकाम तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच रा.से. यो. स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्रजी इंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना हे शिबीर पुढील जीवनाचे प्रात्याक्षिक आहे. या शिबीरात विविध प्रकारचे सामाजिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. असे खुप मोलाचे मार्गदर्शन केले. उपसरंच विनेदभाऊ बोरतवार यांनी गावातील विकास कामाविषयी आणि रासेयो विद्यार्थ्यांकडून गावाच्या विकासासाठी काय करता येईल. याबद्दल मार्गदर्शन केले. सुनिलभाऊ ठाकरे यांनी रासेयो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, प्राचार्य डॉ. आर. एस. खंडारे यांनी विद्यार्थ्यांना सात दिवसीय शिबीरामध्ये घेण्यात येणाया सर्व उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरीता प्रोत्साहीत केले, कार्यक्रमाचे संचालन प्रा.एन.जे. टेकाम यांनी केले तर प्रास्ताविक आणि डॉ.पी.एम. कनाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्राचार्य, कार्यकम अधिकारी आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परीश्रम घेतले.