jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” एक आरोपी अटक २७,८४०/- रुपयाची मालमत्ता जप्त “
” पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर ची कारवाई “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक ०९ मे, २०२५ रोजी गोपनिय माहितीचे आधारे पोलीस ठाणे चंद्रपूर शहर हद्दीतील जुनोना चौक येथील किराणा व्यवसायी नितेश मुकुंदा वाकडे वय ३२ वर्ष याने आपले दुकानात प्रतिबंधीत तंबाखु ठेवल्याची माहितीवरुन पोउपनि बच्छिरे व स्टॉफ यांनी सदर ठिकाणी पंचासमक्ष झडती घेतली असता.
(१) ईगल हुक्काह शिशा तंबाखु २०० ग्रॅम, ४०० ग्रॅमचे एकूण ७९ पाऊच किंमत २७,८४०/- रुपयाचा माल अवैधरित्या विक्री करीता ठेवलेला मिळून आल्याने सदर बाबत अन्न व औषध प्रशासन अन्न सुरक्षा अधिकारी यांना माहिती देण्यात आली असून आरोपीची कसुन विचारपुस केली असता त्याने प्रतिबंधीत तंबाखु पुरवठादार नामे वसीम झिमरी रा. घुटकाला वार्ड चंद्रपूर याचेकडून प्राप्त केल्याचे सांगितल्याने दोद्यांविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक ३३४/२०२५ कलम २२३, २७४, २७५, १२३ भारतीय न्याय संहिता सहकलम ३० (२) २६ (२) (ए) ३, ४, ५९ (आय) अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ त्या अंतर्गत नियम व नियमने २०११ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकरके, पोस्टे चंद्रपूर शहर यांचे नेतृत्वात पोउपनि बच्छिरे व स्टॉफ यांनी केली आहे.