jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” एक लक्ष पंधरा हजार रुपयाची मालमत्ता जप्त ”
” पोलीस ठाणे चंद्रपूर शहर ची कारवाई ”
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक १५ मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अंतर्गत मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन शासकीय डी.एड. कॉलेज ग्रॉऊन्ड बाबुपेठ वार्ड चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर पोलीसांनी पंच, वजन मापधारक, फोटोग्रॉफर सह अवैध अंमली पदार्थ विक्री संबंधाने छापा घालुन नामे महेश सुबोध बाला वय २४ वर्ष रा. जुनोना चौक बाबुपेठ वार्ड चंद्रपूर याची झडती घेतली असता त्याचे जवळ दोन लहान प्लॉस्टीक पिशवीत एम.डी. अंमली पदार्थ पावडर ९,०४० ग्रॅम वजनाचा किंमत ४५,०००/- रुपयाचा आणि आरोपीचे ताब्यात एक मोपेड दुचाकी वाहन सुझुकी एसेस क्र.एम.एच. ३४-सीई-७१९५ किंमत ७०,०००/- असा एकुण १,१५,०००/- रुपयाचा माल मिळुन आल्याने नमुद आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक ३४४/२०२५ कलम ८ (सी), २२ (बी) एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांचे नेतृत्वात पोउपनि संदीप बच्छिरे, मपोहवा भावना रामटेके, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, संजय धोटे, नापोअ कपुरचंद खैरवार, पोअ. इमरान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, मपोशि सारीका गौरकार, दिपीका झिंगरे आदी यांनी केली असून पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.