jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका अंतर्गत वाढोणा या गावातील व्यक्तीवर तेंदुपत्ता तोडण्याकरीता गेल्यास वाघाने हल्ला केला असता गंभीर जखमी केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मारोती शेंडे वय ६४ वर्षे असे मृतकाचे नाव आहे. सदर घटना आज दिनांक १८/०५/२०२५ ला रविवार सकाळी घडली.
तलोधी (बा) वनक्षेत्रातील वाढोणा येथील रहिवासी मारोती शेंडे तेंदुपत्ता तोडण्यासाठी तालोधी (बा) रेंजमधील आलेवाही बिटमधील वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ६५७ मध्ये गेले होते. तेव्हा अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व आरआरयू पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मारोती शेंडे यांना गंभीर अवस्थेत सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी वनविभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आला असून, वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार तपास करीत आहे. मागील ८ दिवसात ६ महिला आणि २ पुरुषावर वाघाने हल्ला करून ठार केले आहे.