jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि बनावट दारू विक्री प्रकरणात अनेक नवे नवे खुलासे रोज होत असल्याने अनेकांच्या चड्डीच्या नाड्या ढिल्ल्या झाल्या आहेत. त्यात शेवगांव च्या डुप्लिकेट दारूचा एक आका पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील असुन एक आका शेवगांव चा आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील “चाँदबिबी महाल परिसरात” विधानसभा इलेक्शन च्या गडबडीत एक डुप्लिकेट दारूचे वाहन पोलिसांनी पकडले होते पण चर्चा कि ” वटकण देऊन घेऊन जागेवर तडजोड झाल्याची शेवगांव तालुक्यात चर्चा ??? अवैध दारू सह “पकडलेल्या गाडीचं शेवगांव कनेक्शन पण होत इलेक्शन” विधानसभा निवडणूक असल्यामुळे कोणत्यातरी बड्या राजकीय नेत्याने फोन केल्याने प्रकरण जागेवर फूस झाले.
शेवगांव पाथर्डी भागात उत्पादन शुल्क विभागाला दर महिन्याला कोट्यवधींचा चुना लाऊन “चोरांवर मोर” होतंय कोण ??? रोख पैसे देऊन बिचारे मद्यपान करणारे नागरिक आपल्याच हाताने आपलं “मौत का सामान” विकत घेत आहेत. बर बनावट दारू स्वस्त मिळत असल्याने पिणारेही एम.आर.पी. पेक्षा दहा रुपये कमी मिळते म्हणुन पितात का ??? हाही मोठा प्रश्न आहे. परमिट रूम असल्यावर बंदिस्त ठिकाणी दारू पिणे बंधनकारक असताना काही नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी लोक दारू पिताना दिसतात.
*ताजा कलम*
“मी शेवगांवकर” ने “बनावट आणि डुप्लिकेट दारूबद्दल” वृत्त मालिका सुरु केल्यापासून महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी असा प्रकार सुरु असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पाथर्डी तालुक्यातील अनेक बड्या राजकीय नेत्याच्या पोटात गोळा आला आहे. उत्पादन तात्पुरते थांबऊन “सौ चुहे खा के बिल्ली चली हज को” असा प्रकार काही भामट्यांकडून सुरु झाला आहे
*क्रमशः*
मी नाही त्यातली आन कडी लावा आतली करतंय कोण ??? अहिल्यानगर उत्पादन शुल्क आणि दारूबंदी खाते कारवाई साठी कोणाच्या आमंत्रणाची वाट पाहत आहे ???
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिम कार्यकर्ता / पत्रकार*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*