काका जागेवरच ठार तर पुतण्या गंभीर जखमी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील मासळ ते पिपर्डा रोडवर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला,तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या गंभीर जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.माणिक साधू चुनारकर (५५) असे मयत इसमाचे नाव आहे, तर मोरेश्वर कुसन चुनारकर (३८) गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे . पिपर्डा येथील हे दोन्ही काका पुतण्या चिमूर येथे प्लांट खरेदी साठी गेले होते.रात्रौला परत स्वगावी पिपर्डा येथे येत असताना हा अपघात घडला आहे.घडलेल्या अपघाता बद्दल गावात डुकराची धडक कि अज्ञात वाहनाची धडक तर नसेल ना असा तर्क वितर्क लावल्या जातं आहे,जबर धडक दिली. या धडकेत माणिक चुनारकर यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर मोरेश्वर हा जखमी झाल्याने त्याला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखम गंभीर असल्याने पुढील उपाचारासाठी खाजगी दवाखान्यात चंद्रपूर ला नेण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार विलास निमगडे, प्रविण तिरनकर , पोलिस झिलपे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला .प्रेत उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत इसमावर पोस्टमार्टम करून प्रेत कुटुंबातील सदस्य कडे देण्यात आले आहे.त्यांच्यावर पिपर्डा येथील स्म्शानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. पिपर्डा येथे दिनांक १८ जानेवारीला राहुल मेश्राम या युवकांने आत्महत्या केली. तर आणि १९ जाणे ला दुर्दैवी अपघात घडला त्यात माणिक चुनारकर मयत झाल्याने पिपर्डा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.