Breaking News

तरटे फुटवेअर मध्ये धाडसी चोरी दोन लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल लंपास

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील नवीन पेठ मोची गल्ली या गजबजलेल्या भागात एक तारखेला मध्यरात्री आज्ञा चोरट्यांनी  राजेंद्र तरटे यांच्या मालकीचे तरटे फुटवेअर या दुकानात श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या बाजूने मागील शटर उचकटून प्रवेश करून सुमारे रोख रक्कम 55 हजार रुपये व दोन लाख एकतीस हजार रुपयांचा ऐवज चोरुण नेला दुकानातील सी.सी. टी.व्ही. कॅमेरा मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सदरच्या चोरीची चित्रण होऊ शकले नाही.

याबाबत चौका पोलीस स्टेशन येथे दुकानाचे मालक सागर राजू तरटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांनी नोंदवून घेतलेल्या फिर्यादीप्रमाणे भा.दं.वि. कलम 1860 प्रमाणे 457, 380 प्रमाणे आज्ञात चोरट्यांचे विरोधातरोख रक्कम व दुकानातील किमती चप्पल व बूट चोरीला गेल्याचे दिसत आहे घटना घडली त्या दिवशी दुपारी चार वाजता अहमदनगर येथील डॉग स्कॉड आले असता या पथकाचे श्वान जागेवरच घुटमळल्यामुळे तपासात प्रगती झाली नाही शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव शहर पोलीस चोरांचा तपास घेत आहेत.

*ताजा कलम*

*अलीकडच्या काळात शेवगा शहरांमध्ये चैन असण्याची पाकीट मारी रोड रॉबरी आणि दुकान फोड्या वाढल्यामुळे शेवगाव पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे रात्रीची पेट्रोलिंग ची गाडी पुढे आणि चोरमागे असा पोलीस चोर खेळ सुरू असल्याची शेवगांवकर अनुभवत आहेत*

*अविनाश देशमुख शेवगाव*

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved