तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड
नागभिड:-पोलीस स्टेशन नागभिड अंतर्गत आज दिनांक 05/05/2024 रोजी मुखबीर चे खात्रीशीर खबरे वरून रेल्वे क्रॉसिंग नागभीड जवळ नाकेबंदी करून अवैद्य जनावरे वाहतुकी संबंधाने वाहनांची तपासणी केली असता.
(1) *महिंद्रा* पिकअप वाहन क्रमांक *MH 34 BZ 1441* की.7,00000/- रु. मध्ये एकूण 4 नग गौवंशीय जनावरे बैल (लाखे पांढरे रंगाचे),(2)महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक *MH 36 AA 2811* की.7,00000/- रु. मध्ये एकूण 4 नग गौवंशीय जनावरे बैल (लाखे पांढरे रंगाचे), (3) टाटा योद्धा पिकअप वाहन क्रमांक *MH 36 AA 2884* की.7,00000/- रु. मध्ये एकूण 4 नग गौवंशीय जनावरे बैल (लाखे पांढरे रंगाचे),प्रती बैल 10,000 /- रू. प्रमाणे एकूण 1,20,000/- रू. असा एकुण कि.*22,20,000/- रू. चा मुद्देमाल यातील आरोपी नामे 1) अक्सर सय्यद अली सय्यद वय 42 वर्ष जात मुसलमान रा. ब्रह्मपुरी.ता ब्रह्मपुरी , 2) देवदास गोमाजी नेवारे वय 40 वर्ष जात गोवारी रा सुकडी ता.साकोली जि.भंडारा , 3) धनराज लक्ष्मण बडवाईक वय 40 वर्ष जात तेली राम पापडा ता.साकोली जि.भंडारा, 4) तोसिफ आसिक पठाण वय 22 वर्ष जात मुसलमान रा.पापडा ता.साकोली जि.भंडारा*, यांनी गौवंशीय जनावरे बैल वाहनात दाटीने कोंबून, निर्दयतेने छळ करून, कत्तली करिता वाहतूक करून नेत असता मिळून आल्याने सदर गौवांशिय जनावरांना वैद्यकीय तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने गौशालेत दाखल करण्यात आले असून नमूद आरोपीतां विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची तरतूद सुरू आहे.सदरची कार्यवाही मा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड, सपोनि पोटभरे, पोलीस अंमलदार अजीत, रोहित,व चा पोशी गजानन यांनी हि,कार्यवाही केली आहे.