सिल्ली येथे संस्कार मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- प्रत्येक नागरिकांना वाटत असते की, माझ्या मुलांचा शैक्षणिक, बौद्धिक, सामाजिक सर्वांगीण विकास व्हावा. त्यांची प्राप्रर्टि म्हणजे त्यांचे मुले. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी तसेच ग्रिष्मकालीन सुट्टीचा फायदा, आनंद घेण्यासाठी अशाप्रकारे विविध संस्कार शिबिराचा लाभ घ्यावे. कारण या शिबिरात शाळेच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाते. म्हणून विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे यांनी व्यक्त केले.ते सिल्ली येथील विनोद विद्यालयात आयोजित संस्कार चळवळ व गांधी विचार मंच, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन भंडारा व विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात सिल्ली यांच्या वतीने निःशुल्क संस्कार शिबिरात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. भांडारकर होते. शिबिराचे उद्घाटन भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार प्राप्त शाहीर कार्तिक मेश्राम, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर, चांदोरी येथील माजी उपसरपंच विकास कागदे, शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे, रमेशचंद्र गजभिये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी योग-प्राणायाम, विविध गोष्टी, स्मरण शक्ती क्रिडा प्रकारच्या माध्यमातून विकास होण्यास मदत होत असते. असे मत शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम यांनी केले.
माणूस शिक्षण व उंचीने मोठा होत असतो. आणि नौकरी संपादित करत असतो. मात्र आलेल्या परिस्थिती चा सामना करण्यासाठी योग्य संस्कारांची गरज भासत असते. कारण मी सुद्धा अशाच संस्कार शिबिरातून घडलो आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार प्राप्त शाहीर कार्तिक मेश्राम यांनी केले.
समाजात वावरत असतांना कोणत्या क्षणी माणसावर काय येणार व आलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी अशाप्रकारच्या संस्कार शिबिरातूनच प्रेरणा मिळत असते. असे मत विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. भांडारकर यांनी मांडले.उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीश चांदेकर व प्रास्ताविक सहप्रमुख यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिबिर सहप्रमुख रमेशचंद्र गजभिये यांनी मानले. संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी
सांची सुखदेवे, संवेदना पडोळे, वेदांती गभणे, श्रावणी पडोळे, जिया देशमुख, प्रतिक साखरवाडे, वेदांत गभणे, वंश गभणे, नैताली पारधी, वेदांती आकरे, आर्यन मेश्राम, ईशानी जगणे, सेजल मेश्राम, ऐश्वर्या मेश्राम, मयुरी आकरे, पूर्वेश गिऱ्हेपुंजे, स्वरा सुखदेवे, पाखी पडोळे, निती पारधी, मंजुषा बुराडे, पुजा हारगुडे, मनिषा डेंगे, रमेशचंद्र चांदेकर, डी. एन. मस्के, एम. पी. काटेखाये, रा. चं. रामटेके, नि. वि. चांदेकर, मनोज खांडेकर, रत्नमाला बावनकुळे इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्कार शिबिरातील विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.