एकाचा जागेवरच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.१३/०५/२०२४ ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुचाकीने पती – पत्नी जंगलातुन तेंदूपत्ता तोडून डोमा येथे स्व घरी परत येत असतांना स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाची दुचाकी वाहनास जबर धडक बसल्याने दुचाकीने पेट घेतला व दुचाकी चालक श्रावण बाजीराव गुरनुले राहणार डोमा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी हि गंभीर जखमी आहे. चारचाकी वाहन घटनास्थळावरून पसार झाल्याचे बोलले जात असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली आहे.शव विच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे.पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.