जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला असून शिवा वाघाला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा येथील प्राणी संग्राहल्यात रवानगी करण्यात आली असून आतापर्यंत तीन लोकांचा त्याने बळी घेतला आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी बफर खडसंगी परिक्षेत्रातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवाने जंगलालगत गावामध्ये धुमाकूळ घालून सूर्यभान कटू हजारे बेंबळा, कूटी रोजंदारी मजूर रामभाऊ रामचंद्र हजारे निमढेला, अंकुश श्रावण खोब्रागडे खानगाव या तीन लोकांना ठार मारले असल्याने नागरिकांनी वनविभागावर रोष व्यक्त केला होता व नरभक्षक वाघाला अटक करण्याची मागणी केली होती. सदर वाघाला पकडण्याकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक रामगावकर, उपसंचालक कुशाग्र पाठक. सहायक वनरक्षक वातोरे. यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ओप्प्रेशन करण्यात राबविण्यात आले.
दिनांक. १८ मे २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र बफर खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र निमढेला येथे भानुसखिंडी वाघाच्या बछड्याला रेस्क्यु आप्रेशन करून पकडण्यात आले. या रेक्यू ऑपरेशन मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांचे सोबत पशूवैधकिय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे. पोलिस नाईक शूटर ए सी मराठे. बायोलाजिस्त राकेश आहुजा सहित सर्व अधिकारी वनरक्षक उपस्थित होते.