कांबीत कुहे कुटुंबावर काळाचा घाला पंचक्रोशीत हळहळ व्यक्त
{ अविनाश देशमुख शेवगांव }9960051755
शेवगांव:– दि.27 सोमवार कांबी येथील नितीन विठ्ठल कु-हे यांच्या पत्नी व विठ्ठल लक्ष्मणराव कु-हे यांच्या
श्रद्धांजलि सुनबाई, ह.भ.प. कृष्णा महाराज कु-हे यांच्या मोठ्या वहिनीसाहेब सौ.सारिका नितीन कुऱ्हे यांचे रविवार दि. १९ मे रोजी अचानक दुःखद निधन झाले. या निधनाने संपूर्ण कांबी गावासह परिसरातील नातेवाईक मित्र परिवार आप्तेष्ट यांना हळहळ वाटत आत्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि. २८ मे मंगळवार रोजी राक्षस भुवन (शनिचे) येथे होणार आहे.हे. नितीन विठ्ठल कु-हे व शिवभक्त ह.भ.प.कृष्णा महाराज कु- हे या दोन्ही भावंडांचे लहान पणीच आईचे छत्र हरपलेले आहे. तशेच कै. सौ. सारिका ताईंचे देखील आई वडील त्यांना लहान पणीच सोडून गेलेले होते. म्हणून त्या दोन्ही कडून आई च्या मायेने पोरक्या होत्या म्हणुन त्यांनी कुऱ्हे कुटुंबाला आईची माया दिली.
त्या कुऱ्हे कुटुंबाची कधी आई झाल्या तर कधी बहीण झाल्या तर कधी लाडक्या वहिनी साहेब झाल्या. त्यांच्या जाण्याने हे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या सागरात बुडून गेले. त्यांच्या मागे प्रथमेश व गणेश नितीन कु- हे ही दोन मुले असून यांची जबाबदारी आता गोरगरिबां च्या कैवारी अनाथांचि माय म्हणुन ज्यांची ओळख असलेल्या कै. सौ.सारिका ताईच्या लहान जाऊबाई . सौ. गौरीताई कृष्णा महाराज कु-हे यांच्यावर आहे. कै.सौ.सारिकाताई कु-हे यांचे माहेर जालना हे असून त्यांचे मामे भाऊ असणारे मनोज आढाव व गजानन आढाव, चंदू भवर यांचा देखील सारिका ताईला खूप मोठा आधार होता. नंदन शिवकन्या शिवाजी लोखंडे व शीतल गणेश पवार यांनी देखील या कुटुंबाच्या पडत्या काळात सहकार्य केले.त्या शिवभक्त ह.भ.प. कृष्णा महाराज कुऱ्हे यांच्या भाऊजयी (वाहिनी) होत्या. या कुर्हे परिवाराच्या दुखा:त संपूर्ण कांबी गावासह नातेवाईक मित्र परिवार सहभागी आहेत. परमेश्वर भगवंत चरणी एकच प्रार्थना या कुटुंबाला या दुखा:तून सावरण्याची ताकत देवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*