Breaking News

मराठा सेवा संघातर्फे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- दिनांक 8 जून 2024 ला शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्रिशतकोत्तर राज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून इयत्ता दहावी मध्ये प्राविण्यप्राप्त विध्यार्थ्याना पुढील वाटचालीस प्रोत्साहित करण्याच्या हेतूने मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्ष भंडारा च्या वतीने स्मृतीचिन्ह व रोपटं देऊन सत्कार करण्यात आला.

राजमाता मॉ जिजाऊ व रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून जिजाऊ वंदनेने अभिवादन करण्यात आले.यानंतर शिवश्री. चंद्रकांत लांजेवार जिल्हाध्यक्ष मसेस भंडारा यांनी मराठा सेवा संघाची भूमिका प्रभावीपणे मांडली.

या गुणवंत सोहळ्यामध्ये तुमसर मधील जनता विद्यालय, शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, भारती कन्या हायस्कूल , लोकमान्य राष्ट्रीय विद्यालय ,न. प.कस्तुरबा विद्यालय, इंदुताई फुलेकर विद्यालय,,न. प.नेहरू हायस्कुल या शाळेतील प्रत्येकी प्रावीण्यप्राप्त दोन विदयार्थी, पालक व शिक्षक यांचे सत्कार करण्यात आले. प्राविण्य प्राप्त विद्यार्थी आर्य राजेश भट, निहाशू जिभकाटे, अक्षित योगेश भुरे,प्रांजल चंद्रकांत लांजेवार,हर्ष पशिने,स्वाती योगेश लांजेवार,गायत्री ठाकूर,यामिनी चाचेरे,चेतना कुंजेकर,श्रावणी वाघमारे,सोफिया पठाण,सोहेल नेत्राम चौधरी, वेदांत संदीप बुराडे, लाव्यण्या हितेंद्र भुरे,अंजली विठ्ठल घिये यांना गौरवकिंत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री. अनिल भुसारी विभागीय अध्यक्ष मसेस, प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री. राहुल डोंगरे मुख्याध्यापक.शारदा विद्यालय तुमसर,
.शिवश्री चंद्रकांत लांजेवार जिल्हाध्यक्ष मसेस भंडारा, शिवमती. प्रतिभाताई लांडगे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड भंडारा,शिवश्री. ॲड.राकेश सिंदेगणसूर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड भंडारा शिवश्री.राजूभाऊ चामट मार्गदर्शक मसेस तुमसर, शिवश्री. जयशंकर मने सचिव मसेस तुमसर, शिवश्री. नाना ठवकर पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री. अनिल भुसारी सर यांनी विद्यार्थांना करिअर बद्दल मार्गदर्शन केले. शिवश्री. राहुल डोंगरे सरांनी छत्रपती शिवराय यांच्या जीवन चरित्र समजून घ्यावे, असे मनोगत व्यक्त केले तर शिवश्री, राकेश शिंदेगण सूर यांनी विदयार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याबाबत प्रोत्साहित केले.या सत्कार सोहळ्याच्या अनुषंगाने शिवमती. प्रा.निरूपमा भोयर यांना मसेस तुमसरच्या सहसचिव या पदाची जबाबदारी सोपवून नियुक्ती पत्रक देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमती प्रीतीताई भोयर तालुकाध्यक्ष मसेस तुमसर यांनी केले तर समारोप शिवमती. हिरा बोन्द्रे तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तुमसर यांनी केला.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिवमती. नितुवर्षा घटारे उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तुमसर, शिवमती शुभांगी भट कोषाध्यक्ष मसेस तुमसर, शिवमती. सुलभा हटवार कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तुमसर, शिवमती. अंजली लांजेवार संघटक जिजाऊ ब्रिगेड तुमसर, शिवमती. शितल भुसारी कोषाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तुमसर,शिवमती. कल्पना चामट सदस्य जिजाऊ ब्रिगेड तुमसर, शिवमती. रत्ना मने सदस्य जिजाऊ ब्रिगेड तुमसर, शिवमती रुपाली खराबे सदस्य जिजाऊ ब्रिगेड तुमसर,
शिवमती. सुगंधा डोंगरे सहासंघटिका जिजाऊ ब्रिगेड तुमसर, शिवमती. बाली सारवे सदस्य जिजाऊ ब्रिगेड तुमसर, शिवश्री. अजय भेदे, शिवश्री. सुदाम बोरकर, शिवश्री. दीपक दादा बांते ,शिवश्री. संजूदादा सार्वे यांनी मोलाचे सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved