सोशल मीडिया वरून गुंतवणूकदारांना धमकावणाऱ्या बिग बुल्स च्या वाजल्या पिपाण्या
शेवगाव तालुक्यात घडलेला प्रचंड मोठा “शेअर मार्केट” घोटाळ्यातील अनेक फरार “बिग बुल ट्रेडर” पैकीच 20 करोड रुपये घेऊन फरार एकावर पहिल्यांदाच शेवगाव पोलिसांची कारवाई झाली
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052756
शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील सुमारे 25 ते 30 शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांनीॲड.आकाश लव्हाट , ॲड.सुहास चव्हाण व ॲड.अतुल लबडे यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे गदेवाडी च्या 26 तक्रारदारांची तक्रार स्वीकारून 420, 406, 34 कलम अंतरगत गुन्हा दाखल व आरोपी शेवगाव पोलीस स्टेशन येथे जेरबंद. यांच्या मार्गदर्शनाखाली केली फिर्याद दाखलइन्व्हेस्टींग डॉट कॉम नावाने एक शेअर मार्केट ट्रेडींगचे ऑ अक्षय मेशोक इंगळे व त्याचा भाऊ अविनाश मेशोक इंगळे दो.रा. गदेवाडी ता. शेवगाव हे दोघे माझ्या गावात राहणारे असून माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत.
दि. 10/ 02/ 2024 रोजी अक्षय इंगळे हा माझ्या घरी आला होता व मला म्हणाला की, मी व माझा भाऊ अविनाश इंगळे अश्यांनी गदेवाडी गावात इन्व्हेस्टींग डॉट कॉम नावाने एक शेअर मार्केट ट्रेडींगचे ऑफीस सुरू केले असून त्यासाठी तुम्ही आम्हाला तुमचे पैसे द्या. तुम्ही जर आम्हाला पैसे दिले, तर मी तुम्हाला दर महीण्याला 12 टक्के व्याज देतो.
असे अश्वासन देवून माझा विश्वास संपादीत केल्याने मी अक्षय इंगळे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांला दि. 13/02/2024 रोजी अक्षय इंगळे व अविनाश इंगळे यांचे गदेवाडी गावातील इन्वेस्टींग डॉट कॉम नावाच्या ऑफीसला जावून मला बचत गटातील मिळालेले दिड लाख रू. रोख स्वरूपात व पन्नास हजार रु. फोनपे द्वारे अक्षय इंगळे याचा फोन पे. नंबर 8928093653 यावर ट्रांसफर केले होते. असे एकूण दोन लाख रू. (2,00,000/-) अक्षय इंगळे व अविनाश इंगळे यांना दिले होते. त्यावेळी अक्षय इंगळे याने मला पैसे मिळाल्याच्या पावत्या दिल्या होत्या. तेंव्हा त्यांनी आम्हाला चांगल्या परताव्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सुरूवातीच्या 1 महीना त्यांनी मला माझ्या पैश्यांचा परतावा म्हणून 24,000/- रु. दिले होते. परंतू दुसऱ्या महीण्यापासून त्यांनी मला परतावा देण्यासाठी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली.
अक्षय इंगळे व अविनाश इंगळे हे परतावा देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने मी त्यांच्याकडे गुंतवलेल्या पैश्यांची मागनी केली. तेंव्हा त्याने पैसे देण्यास टाळाटाळ करून मला उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच मी वेळोवेळी अक्षय इंगळे याचा मोबाईल क्र. 8928093653 यावर वॉट्सअप द्वारे मॅसेज करून पैश्यांची मागनी करत होतो. परंतू तो तुमचे पैसे मी लवकरच परत करील असे कारणे सांगून उडवा उडवीची उत्तरे देत असत. त्यानंतर मी माझे पैसे घेण्यासाठी दि. 14/04/2024 रोजी अक्षय इंगळे याच्या कार्यालयात गेलो असता ते बंद होते. तेंव्हा तेथे जमलेल्या लोकांकडून मला समजले की, अक्षय मेशोक इंगळे व त्याचा भाऊ अविनाश मेशोक इंगळे हे आपले पुर्ण परिवारासह घर व ऑफीस सोडून लोकांचे पैसे घेवून पळून गेले आहेत. तेथे जमलेल्या लोकांना मी विचारपूस केली असता मला त्यांचेकडून समजले की, अक्षय इंगळे व अविनाश इंगळे यांनी लोकांचा विश्वास संपादन करून अधिक परताव्याचे खोटे आश्वासन देवून माझ्या सारख्या इतर लोकांची देखील आर्थीक फसवणूक केली आहे.
त्यांची माहीती खालील प्रमाणे
1)1,00,000/- रू. गणेश लक्ष्मण मडके रा.गदेवाडी ता. शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 2)1,00,000/- रू. राम बाबासाहेब डुकरे रा. गदेवाडी ता. शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 3)2,00,000/- रू. दत्तु भानुदास नाचन रा. गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 4)1,00,000/- रू. चंद्रभान जगन्नाथ नाचन रा. गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 5)50,000/- रू. मिठुभाई इमाम शेख रा. गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 6)1,00,000/- रू. शेख छबुलाल हुसेन रा. गदेवाडी ता. शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 7)8,90,000/- रू. अशोक सुभाष नाईक व सोमनाथ मोहन मडके दोन्ही रा.गदेवाडी ता.शेवगाव यांनी दिलेली रक्कम 8)2,50,000/- रू. रामेश्वर चांगदेव मडके रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 9)3,00,000/- रू. अशोक भिमराव गहाळ रा. चापडगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर यांनी दिलेली रक्कम 10)1,00,000/- रू. सावळेराम भाऊराव पायघन रा. आखेगाव ता. शेवगाव यांनी दिलेली रक्कम 11)1,00,000/- रू. अशोक मुरलीधर इसरवाडे रा. गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 12)2,00,000/- रू. संभाजी नारायण कुँलाडे रा. गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली 13)12,50,000/- रू. बाळासाहेब भगवान धनवडे रा.गदेवाडी ता. शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 14)2,00,000/- रू. शंकर बाबासाहेब मडके रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 15)1,70,000/- रू. कालीदास आसाराम गायकवाड रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 16)1,00,000/- रू. स्वप्नाली रामेश्वर जाधव रा.गदेवाडी ता. शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 1711,30,000/- रू. भगवान एकनाथ तिळवणे रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 18)5,00,000/- रू. सोमनाथ विठ्ठल मडके रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 19)2,25,000/- रू. मारुती बाबुराव विघ्ने रा. हसनापुर ता. शेवगाव जि. अहमदनगर यांनी दिलेली रक्कम 2012,50,000/- रू. योगेश रावसाहेब धनवडे रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 21)2,50,000/- रू. मोहन दत्तात्रय कातकडे रा. आखेगाव ता. शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 2218,05,000/- रू. संजय सुधाकर जोशी रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 23)2,00,000/- रू. संभाजी ज्ञानदेव नाचन रा. गदेवाडी ता. शेवगाव जि.अ.नगर यांनी दिलेली रक्कम 24) 1,65,000/- रू. आप्पासाहेब पुंजाराम पायघन रा. आखेगाव ता. शेवगाव यांनी दिलेली रक्कम
करुडगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर यांनी दिलेली रक्कम
25)7,00,000/-रू. अरुण विजय निळ रा. कुरुगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर यांनी दिलेली रक्कम 26) 16,75,000/- रु. प्रशांत भास्कर शिंदे रा. एरंडगाव ता. शेवगाव जिल्हा अ.नगर यांनी दिलेली रक्कम 83.10,000/- रु. एकूण अक्षरी रक्कम 83 लाख 10 हजार रुपये तरी दि. 10/02/2024 रोजी पासून ते आज पावेतो माझेकडून व इतर गुंतवणूकदारांकडून आमच्या गावातील अक्षय मेशोक इंगळ व त्याचा भाऊ अविनाश मेशोक इंगळे यांनी गुंतवणूकीवर अधिकचा परतावा देण्याचे आमीष दाखवून आमचा विश्वास संपादन करून आमच्याकडून एकूण 83,10,000/- रु. रक्कम रोख व ऑनलाईन स्वरूपात घेवून आमच्या पैश्यांचा अपहार करून आमची आर्थीक फसवणूक केली आहे.
म्हणून माझी अक्षय मेशोक इइंगळे व त्याचा भाऊ अविनाश मेशोक इंगळे दोन्ही रा. गदेवाडी ता. शेवगांव जिल्हा अहमदनगर यांचे विरुध्द फिर्याद आहे. शेवगाव पोलीस स्टेशनला काल रात्री उशिरा दिनांक 12 जून 2024 रोजी मध्यरात्री भा.द.वी. कलम 420 प्रमाणे वरील आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी. एस. आय. श्री अमोल पवार हे करत आहेत हा गुन्हा दाखल करण्याकामी ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट अविनाश मगरेशेवगाव तालुक्यात घडलेला प्रचंड मोठा “शेअर मार्केट” घोटाळ्यातील अनेक फरार “बिग बुल ट्रेडर” पैकीच 20 करोड रुपये घेऊन फरार एकावर पहिल्यांदाच कारवाई झाली. ॲड.आकाश लव्हाट , ॲड.सुहास चव्हाण व ॲड.अतुल लबडे यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे गदेवाडी च्या 26 तक्रारदारांची तक्रार स्वीकारून 420, 406, 34 कलम अंतरगत गुन्हा दाखल व आरोपी शेवगाव पोलीस स्टेशन येथे जेरबंद. अजून 30 ते 35 बिग बुल फरार असून चार ते पाच हजार गुंतवणूकदार त्यांची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
*ताजा कलम*
*गेल्या ४ वर्षांपासून शेवगाव तालुक्यामध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली दरमहा १० ते १५ टक्के व्याजदराने ठेवी घेणारे लहान मोठे १५० ते २०० ऑफिस सुरू झाले. त्यामधे काही ह.भ प. महाराज लोकांनी ही ऑफिस उघडले व पैसे घेण्यास सुरू केले. आज शेवगाव मध्ये एकही तथाकथित ट्रेडर जागेवर नाही सर्व पैसे घेऊन फरार झाले आहेत. अशावेळी गुंतवणूकदारांना कोणत्याच प्रकारचा दिलासा मिळत नाहीये व पुढे काय करावे याचे मार्गदर्शन नाही. पैसे परत मिळतील न मिळतील हा भाग नंतरचा आहे पण गुन्हे दाखल करून आरोपी हजर करणे हे अत्यंत गरजेचे आहे व न्यायप्रविष्ठ मार्गाने प्रथम पाऊल आहे.*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*