विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील भागवत एरंडगाव येथील रहिवासी असलेला कैलास दत्तात्रेय भागवत वय 35 याने एरंडगाव येथे के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून शेकडो गावकरी शेतकरी नातेवाईक यांना गंडा घातला पंधरा दिवसापूर्वी आपले राहते घर आणि साडेसात एकर शेतीचा व्यवहार करून लाखो रुपये पेमेंट घेऊन गाव सोडून फरार झाला विशेष म्हणजे त्याचे बरेचसे नाते पोलीस दलात आणि सरकारी खात्यात मोठ्या पदावर आहेत वडील सुद्धा पोलीस खात्यात नोकरीला होते परंतु म्हणतात ना हिऱ्याच्या पोटी गारगोटी यातील काहीं बड्या नातेवाईकाना सुद्धा त्याने लाखो रुपयांना गंडा घातल्याची चर्चा आहे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता 20 ते 25 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची सकृत दर्शनी निदर्शनास येत आहे आज होणार त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल नवनिर्वाचित खासदार निलेश लंके साहेब यांच्याकडे केल्या लोकांनी तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकारी लवकरच आवळणार फरार बिग बुल्स च्या मुसक्या.
*ताजा कलम*
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना डिमॅट अकाउंट ओपन करून ऑनलाइन रक्कम स्वीकारली जाते परंतु या भामट्या बिग बुल्स णी लोकांकडून रोख स्वरूपात रकमा स्वीकारले आणि त्यातून किलो मध्ये सोण स्थावर मालमत्ता आणि जवळच्या नातेवाईकांच्या नावावर खात्यामध्ये कोट्यावधीचा रकमा जमा केल्या
{ क्रमशः }
*त्याचा एक जवळचा मित्र जो कृषी सेवा केंद्र चालवतो त्याने त्याला 3% कमिशनवर सुमारे पाच कोटी रुपये गोळा करून दिले त्यातील काही रक्कम हडप केली आणि त्याचे सोने खरेदी करून ठेवल्याची चर्चा आहे तो कोण ??? याची चर्चा तालुक्यात सुरु आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*