Breaking News

नगरपरिषद चा आरोग्य विभाग साखर झोपेत सभागृह नसल्याने जाब विचारणारे कोणी नाही शेवगावकरांची आरोग्याची वरात वाऱ्यावर???

प्रभाग क्रमांक 14 मधील कुबेर कॉलनीच्या कॉर्नरला आंबेडकर चौकामध्ये शेवगाव शहरातील सर्वात मोठा जम्बो खड्डा शेवगा नगरपरिषदेने येथे होड्यांची स्पर्धा ठेवायला काही हरकत नाही

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गेले कित्येक महिने शेवगांव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील कुबेर कॉलनीच्या कॉर्नरला आंबेडकर चौकामध्ये शेवगाव शहरातील सर्वात मोठा जम्बो खड्डा शेवगा नगरपरिषदेने येथे होड्यांची स्पर्धा ठेवायला काही हरकत नाही शहरातील अनेक प्रभागांमद्ये साफसफाई घनकचरा व्यवस्थापन स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्ती आणि अंडरग्राउंड गटारीचे साफसफाई आणि डागडुजी झालीच नाही नळाला पाणी सुटले की गटारात आणि तेच गटारीचे पाणी साऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी पिण्याची पाईपलाईन जीर्ण झाली असुन पन्नास वर्षांपुर्वी झालेली लाईन शेवटच्या घटका मोजत आहे आधी पिण्याची पाईपलाईन मग अंडरग्राउंड गटारी मग स्ट्रीट लाईट आणि मग रस्ते व्हायला पाहिजे होतें.

पण गेल्या दहा वर्षांमध्ये नगरपालिका स्थापन झाल्यापासुन शहरातील सर्व विकासकामे उलट्या क्रमाने झाल्याने शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया गेल्या सारखी परिस्थिती आहे शेवगावकरांना “भीक नको पण कुत्र आवर” म्हणण्याची पाळी आली आहे सगळीकडे साचलेले उकांडे वाढलेले काटवन शहरात चौकाचौकात झालेले अतिक्रमण दुकानदारांचे रस्त्यांवरील अतिक्रमण धनदांडग्यांनी लाटलेले पालिकेचे ओपन प्लेस सरकारी मालकीचे भूखंड “एक ना धड भराभर चिंध्या” अशी बकाल अवस्था शहराची झाली आहे शहरात अनेक विकास पुरुष होऊन गेले पण शहाराचा विकास काही झाला नाही गेल्या चार साडेचार वर्षांपासुन नगरपरिषदेला जाब विचारणारे कोणी नाही त्यामुळे पालिकेत सगळे प्रभारी राजा असून पाथर्डीचे अधिकारी आणि कर्मचारी शेवगाव नगर परिषदेचा कारभार हाकताना दिसत आहेत त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शेवगाव- पाथर्डी ची आषाढी- कार्तिकी ची वारी सुरू असते* सगळा मनमानी कारभार सर्वसामान्य शेवगांवकर गपगार.

*ताजा कलम*

मध्यंतरी शेवगांव नगरपरिषदेचे कार्यालय शहरात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले शेवगांव तहसील कार्यालयाच्या ईमारतीत तात्पुरते शिफ्ट होणार असल्याचे जोरदार चर्चा झाली पण कोठे माशी शिंकली काय माहित??? अबाल वृद्ध महिला आणि सर्वसामान्य नागरिक याना शहरापासून दूर असणाऱ्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात पाण्याच्या टाकीजवळ गावात काही कारभार घरकुल आणि जन्ममृत्यू दाखले व ईतर कारभार प पैठण रोडच्या क्रीडा संकुलात शोले पिक्चर सारखे झाले “आधे ईधर जाओ आधे उधर जावं बाकीके मेरे पीछे आव”

*क्रमशः*
*अहमदनगर चे जिल्हाधिकारी शेवगाव नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी अनिकेत चे पूर्णवेळ अधिकारी देणार का ??? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved