हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ { ऍडमिट } अवस्थेत असताना सुद्धा समाज सेवेचा ध्यास घेतलेल्या श्रीमती विद्या भाऊसाहेब गाडेकर एक आदर्श सामाजिक नेतृत्व विधान सभेसाठी शेवगाव-पाथर्डी मतदार संघात इच्छुक राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटासाठी चुरस वाढणार
{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
शेवगाव:- नगर दक्षिण या लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणारा शेवगाव-पाथर्डी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट पक्षाच्या अधोगतीला कारणीभुत ठरली आहे. सन २०१४ ची मोदी लाट आणि २०१९ मध्ये अँड प्रताप ढाकणे यांना दिलेली उमेदवारी. हा प्रयोग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अंगलट आला आहे. अँड प्रताप ढाकणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मोनिकाताई राजळे ह्या भाजपाच्या उमेदवार दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
मतदार संघातील एक ताजी घडामोड नुकतीच समोर आली असून श्रीमती विद्याताई गाडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तिकीट मिळण्याचे संकेत मिळत आहेत. विद्याताई गाडेकर हा ओ.बी.सी. चेहरा असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यां व शरदचंद्र पवार गटाच्या खंद्या समर्थक आहेत. २०१९ च्या निवडणुकीत अँड प्रताप ढाकणे यांचा झालेला पराभव मा. शरद पवार यांच्या जिव्हारी लागला असून २०२४ च्या विधानसभेसाठी ते विद्याताई गाडेकर यांचा समर्थ पर्याय म्हणून विचार करू शकतात.
या मतदारसंघात पारंपरिक उमेदवार मा. चंद्रशेखर घुले पाटील हेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तिकीटासाठी इच्छुक आहेत. खासदार निलेश लंके यांच्या पाठींब्यामुळे अँड प्रताप ढाकणे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तिकीटासाठी इच्छुक आहेत. या परिस्थितीमध्ये शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तिकीटासाठी चुरस वाढली आहे. परंतु पवार साहेब कोणावर भरवसा टाकतात. ऐनवेळी तिकीटाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यावर मतदार संघाचे भवितव्य अवलंबून आहे.
*ताजा कलम*
यंदा शेवगाव पाथर्डी च्या विधानसभेची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता जास्त आहे यामध्ये विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे मागील वेळेचे पराभूत उमेदवार ऍड. प्रताप काका ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार शेखर घुले पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण भाऊ मुंडे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण जनशक्ती महिला मंचच्या सौ. हर्षदा शिवाजीराव काकडे भारतीय जनता पार्टीचे दुसरे उमेदवार श्री गोकुळ भाऊ दौंड शिवसेना उ.बा.ठा.गटाचे ऍड.अविनाश मगरे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड संजय नागरे यामुळे पक्ष सहा आणि इच्छुक उमेदवार 10 अशी अवस्था मतदार संघाची झालेली आहे इतरही छोट्या-मोठ्या पक्षाची व पक्ष उमेदवार उभे राहू शकतात
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*