Breaking News

नागपंचमी च्या दिवशी दिले नागाला जीवनदान

सर्प मित्रामुळे आजपर्यंत मिळाले अनेक सापांना जीवनदान

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे 

राळेगाव:- राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे नागपंचमी च्या दिवशीच गवाळ्या जातीचा विषारी नाग सिडाम यांच्या घरात आढळून आला नाग दिसताच घरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. साप असल्याचे समजताच चहांद येथील सर्पमित्र गौरव रवी जवादे यांनी लगेच सिडाम यांचे घरी जाऊन नागाला जिवंत पकडले.

नागाला पकडताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.यावेळी सर्पमित्रांनी नागा विषयी उपयुक्त अशी माहिती सांगितली व नंतर नागाला नैसर्गिक अधिवसात सोडण्यात आले. यावेळी सर्पमित्र गौरव जवादे, शिवम वाघाडे, गणेश सिडाम,भूषण पाटील, गेडाम, आदी. सर्पमित्र टीम हजर होती

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved