Breaking News

जिल्हास्तरीय अजिंक्यपद वुशू स्पर्धेत रिया गोटेफोडे चे सुयश

जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा ) – ऑल भंडारा जिल्हा वुशू असोसिएशन भंडारा व ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने १६ वी जिल्हास्तरीय अजिंक्यपद वुशू स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील बॅटबिंटन हॉल येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील विद्यार्थ्यींनी रिया गोटेफोडे ने जिल्हास्तरीय अजिंक्यपद वुशू स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आणि तीची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. रिया गोटेफोडे ला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.रिया गोटेफोडे ही जे. एम पटेल महाविद्यालयात बीएससी कॉम्पुटर ला प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.

विजयी संघाने आपल्या यशाचे श्रेय जे. एम पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांना दिले. असून यशस्वी झालेल्या संघाचे गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन, कोषाध्यक्ष निखिल जैन यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तीक पन्नीकर, डॉ. शाम डफरे, कॉम्पुटर सायन्स विभागाचे डॉ. प्रविण घोसेकर, क्रिडा विभाग प्रमुख डॉ. भिमराव पवार, डॉ. रोमी बिष्ट व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारीवर्ग तसेच ऑल भंडारा जिल्हा वुशू असोसिएशनचे अध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी अभिनंदन केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved