Breaking News

प्रश्न विद्यार्थ्यांचे,उत्तर आमदारांचे विद्यार्थ्यांनी साधला आमदारांशी संवाद – नेहरू विद्यालय चिमूरचां उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- नेहरू विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय चिमूरच्यां विद्यार्थ्यांनी प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तर आमदारांचे. संवाद आमदारांशी या कार्यक्रमात संवाद साधला विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार किर्तिकुमांर भांगडीया यांनी उत्तर दिले. या कार्यक्रमाने मुलांमधे उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी नेहरू विद्यालय चिमूरच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विद्यालय मधून विद्यार्थी बाहेर पडताना विद्यार्थ्यांनी सक्षम होण्यासाठी नेहरू विद्यालयचे मुख्याध्यापक विविध उपक्रम व कार्यक्रम राबवित असतो त्याच अनुषंगाने दिनांक २७ आगस्ट रोजी सकाळी ९ वाजता प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तर आमदारांचे.विद्यार्थ्यांचा आमदारांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया उपस्थित झाले. आमदार भांगडिया हे नेहरू विद्यालयचे माजी विद्यार्थी असून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपने उत्तरे दिली.
चिमूर शहरात शिक्षण व्यवस्थेच्या असलेला अभाव आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करणार. विद्यार्थ्यानसाठी शिक्षणाच्या कोणत्या सोई उपलब्ध करणार. यासारखे विविध प्रश्नांना आमदार किर्तिकुमांर भांगडीया यांनी आमदारासी संवाद कार्यक्रमात उत्तर दिले,विद्यार्थ्यांनी ४६५ प्रश्न तयार केले होते त्यातून ७० प्रश्न विचारण्यात आले सर्व प्रश्नाचे उत्तर आमदार भांगडीया यांनी हसत खेळत दिले. प्रश्न विचारल्याचे समाधान मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कार्यक्रमाचे संचालन भालचंद्र लोढे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेश वाघधरे यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved