जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा) – आंबाडी गावाच्या विकास कामासाठी नियमबद्धपणे प्रमाणिक प्रयत्न केले असे प्रतिपादन भंडारा येथून जवळच असलेल्या आंबाडी ,पालगाव गिरोला गट ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी देवदास फागण पडोळे यांनी सत्कार समारंभ सोहळा प्रसंगी उद्गगारले . ज्या गावात आपला जन्म झाला अश्या मायभुमित शासन सेवा करने प्रामुख्याने टाळले जाते मात्र आयुष्यात आपल्या हातून ग्रामीण विकास कामात हातभार लागल्याने ऐतिहासिक कार्य घडावे म्हणुन सिल्ली येथील देवदास फागन पडोळे यांनी मायभूमी लगतच्या आंबाडी गट ग्रामपंचायत येथे पंचायत विभागाच्या नियमात बसणारी आंबाडी , पालगाव, गिरोला येथील विकास कामे निस्वार्थपणे यशस्वीरीत्या पूर्ण केले असल्याने त्यांच्या कार्यकौशल्याचे गुणगान व्यक्त करत आंबाडी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामवासियांनी ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी करत बग्गी व रयाली काढून आंबाडी ते सिल्ली पर्यंत सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा केला .या सत्कार समारंभ सोहळा कार्यक्रमाला भंडारा जिल्हा परिषद चे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी व भंडारा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे , विवेक सुखदेवे, यांनी ग्रामीण विकास यंत्रणा कार्यात सहभागी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून सहभाग दर्शविला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबाडी ग्रामपंचायत चे सरपंच भजन भोंदे , उपसरपंच गुरुदास बावणकर, ग्रामपंचायत सदस्य अमीर बोरकर, मनोहर धुर्वे,मेघा भुरे,गुलाब वंजारी, ईश्वरी बोरकर, कुंदा साखरवाडे, सौ.प्रमिला लांजेवार, सौ.कडव ग्रामपंचायत लिपिक सौ.सुनंदा बावणे, पंप ऑपरेटर सुखदेव मारबते, निलिमा वंजारी,सौ. निर्मला देवदास पडोळे, शेखर बोरकर,पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी,प्रणय पडोळे सौ. कामीनी पडोळे तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रा.संजय भुरे, धनराज भुरे,सिल्ली ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच रामदास पडोळे, कंत्राटदार संजय नशिने, देवणाथ कळंबे मनोज पडोळे माजी सरपंच रामलाल बावणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आंबाडी ग्रामवासी तसेच उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संजय भूरे यांनी केले तर मनोहर धूर्वे यांनी सर्वांचे आभार मानले.