जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- इंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय असे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक यांचे चिमूर क्रांती भूमीत होणार आगमन.
आमदार बंटी भांगडिया व भाजप तालुका चिमूरच्या वतीने दिनांक ३० सप्टेंबर ला हभप प्रसिद्ध प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरीकर महाराज ) यांचे जाहीर कीर्तनचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र चे प्रसिद्ध कीर्तनकार हभप प्रबोधनकार यांचा जाहीर कीर्तन कार्यक्रम दिनांक ३० सप्टेंबर साय. ५ वा बिपीएड कॉलेज च्या मैदान पिंपळनेरी रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. कीर्तन प्रेमी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजका कडून करण्यात आले आहे.