स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विवीध कार्यक्रम व विवीध मान्यवरांचा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- कुंटूबाचे करत सामाजिक क्षेत्रातील चळवळ, शैक्षणिक क्षेत्रातील वातावरण, समाजातील आरोग्य सांभाळत अंगणवाडीतील बालकांची शी असो की अन्य काही सर्वांना आपूलकीने सांभाळते मात्र एकीच्या बळावर अंगणवाडी ताई इथपर्यंत येवून पोहचल्या हेच मोठ संघटन आहे. एवढे करूनही समाजात अंगणवाडी ताईची दखल घेतली जात नाही. ही एक शोकांतीका आहे. अंगणवाडी कर्मचारी ताई नाहीत तर त्या आई आहेत असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या उद्धघाटक सामाजिक कार्यकर्त्या संध्या पवार कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मंचावरून बोलत होत्या अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) संलग्न हिंद मजदूर सभा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिमूर तालुक्यांतील अंगणवाडी कर्मचारी व बचत गट प्रतिनिधी यांचा स्नेह मिलन सोहळा, पत्रकार व विवीध मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा स्मारक चिमूर येथे २० ऑक्टोंबर रविवार ला करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमांचे अध्यक्ष माजी अध्यक्षा जिल्हा परिषद भंडारा तथा कार्याध्यक्षा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र किसनाताई भानाकर, कार्यक्रमांचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संध्या पवार, जिल्हा अध्यक्ष तथा विदर्भ महासचिव इमरान कुरेशी, कल्पना साठवणे, प्रकाश बोकारे, उषा अलबनकर, अनू चौधरी, नलीनी खानोरकर, किर्ती शिंदे, सयोगिता गेडाम, विद्या वारजूकर, अनापूर्णा हिरादेवे, सामाजिक कार्यकर्ते तळोधी शकील शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा किसनाताई भानारकर अध्यक्षीय भाषणातून अंगणवाडी सेविका कर्मचारी यांना बोलतना म्हणाल्या की संघटना ही महत्वाची असते. संघटनेच्या बळामुळे आपले मानधन वाढले. संघटनेला कमी लेखू नये संघटना वाढी साठी प्रयत्न करावा व संघटनेसी जुळून रहावे संघटनेच्या कर्मचारी सदस्य यांनी एकमेंकाना सहकार्य करावे. दरम्यान शिक्षक भारतीचे भास्कर बावणकर, चिमूर तालुका प्रेस, वॉईस ऑफ मिडियाचे पत्रकार गुणवंत विद्यार्थी, अंगणवाडी सेविकां मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. अंगणवाडी सेविकां व त्यांच्या पाल्यांनी नृत्य, नाटीका, किर्तन व गायन सादर केले. कार्यक्रमाला वरोरा चिमूर सिंदेवाही नागभिड भद्रावती ब्रम्हपूरी येथील अंगणवाडी सेविका कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन धरती वाघमारे आभार माधूरी विर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अर्पणा नरोले निलम गेडाम शोभा गोडे मनिषा गोठे यांचे सहकार्य.