जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे – एस. एम. बियाणी लॉ कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदशन करतांना अॅड. भंडारी यांनी सांगितले की, सध्या सायबर गुन्हेगार हे नागरीकांना लुबाडण्यासाठी नवनविन युक्त्या शोधून काढतात उदा. डिजीटल अरेस्ट आणि किंवा तुम्ही पाठवलेले पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहे असे भासवून तुमच्याशी बरेच तास बोलून ते तुम्हाला डिजीटल अटक करण्याची धमकी देतात आणि तुमच्याकडून तुमची खाजगी माहिती जसे की, आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स इ. ची संपुर्ण माहिती घेवून तुमचे बँक खाते रिकामे करतात, अशा प्रसंगी विद्यार्थ्यांनी घाबरुन जावू नये म्हणून त्यांना अॅड. भंडारी यांनी काही टिप्स दिल्या.
तसेच विदयार्थ्यांच्या सायबर सायकोलॉजी मध्ये सकारात्मक बदल कसा करावा, तसेच जे काही विद्यार्थी सायबर ऑनलाईन छळवणुक, ऑनलाईन बुलिंग, ऑनलाईन गेमिंग, ट्रेडींग अॅप, “फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा अशी स्कीम” ऑनलाईन फॉड याला बळी पडले असतील, ऑनलाईनच्या समस्यांमुळे डिप्रेशन मध्ये गेले असतील त्यांना या व्याख्यानाव्दारे मार्गदर्शन अॅड. भंडारी यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अॅड. भंडारी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून ऑनलाईन हॅकर्स आपल्याला कशा पध्दतीने, कोणत्या पध्दतीने आपला आर्थिक व मानसिक छळ करतात ते देखील डेमो करुन दाखविले व विदयार्थ्यांना आपली बँकेसंदर्भातची सर्व माहिती सर्व डिटेल्स गोपनीय ठेवावी व ती कोणालाही विनाकारण शेअर करुन नये असे आवाहन देखील केले. तसेच फसवणुक झालेल्या नागरीकांनी १९३० या टोलफ्री नंबरवर तक्रार करावी असे आवाहन सायबर अॅवरनेसचे फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांनी उपस्थित असलेल्या विदयार्थी वर्गाला आवाहन केले. या कार्यक्रमाच्या वेळी एस. एम. बियाणी लॉ कॉलेजचे संस्थापक अलका बियाणी मॅडम, अॅड. आशिष गांगुर्डे, अॅड. प्रशांत वाघ तसेच कॉलेजमधील प्राध्यापक वर्ग व कॉलेजमधील कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.