जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता बारेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष साधना श्रीरामे,पोलीस पाटील रामचंद्र सहारे,आरोग्य सेवक मोहुर्ले,अंजनाबाई दोडके,रामचंद्र बारेकर,हरिदास पोईनकर,रवींद्र मेश्राम,सुवर्णा भोयर, इंदिरा घरत,मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते.
आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेतील विद्यार्थीनी आराध्या श्रीरामे, अर्पिता श्रीरामे आणि वैष्णवी मेश्राम यांनी सावित्रीमाईंची वेशभूषा केली.सावित्रीमाईंच्या जीवनकार्यावर सुरेश डांगे,सुवर्णा भोयर,मोहुर्ले यांनी माहिती दिली.सावित्रीमाईंनी केलेल्या कार्याचे विस्मरण न होऊ देणे, सावित्रीमाईंच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल असे मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील विद्यार्थी सेजल बारेकर, साक्षी पोईनकर,पियुष दोडके, प्रांशुल बारेकर,वैष्णवी मेश्राम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले.संचालन व आभारप्रदर्शन हरिकृष्ण कामडी यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी तथा पालक उपस्थित होते.