भिसी पोलीस स्टेशन येथे पाक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अल्पवयीन बालीकेवर ४० वर्षीय युवकाचा अत्याचार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील गजबजलेल्या भिसी येथे ४० वर्षे वयाच्या नराधमाने एका अल्पवयीन बालीकेला चाकलेटचे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना रविवारला अंदाजे तीन वाजताचे सुमारास उघडकीस आली. पिढीत बालीकेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन भिसी येथे पाक्सो कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवारला दुपारी तीन वाजताचे सुमारास आरोपी अरविंद हरिदास नगराळे वय अंदाजे ४० वर्षे राहणार भिसी या युवकाने एका अल्पवयीन बालीका आपल्या समवयस्क बालकांसोबत घराजवळ खेळत असतांना आरोपीने बालीकेसोबत खेळत असलेल्या बालकांना खाऊसाठी पैसे दिले व त्याला दुकानात पाठवून दिले त्यानंतर आरोपीने पिढीत बालीकेला चाकलेटचे आमीष दाखवून एका पडक्या घराच्या आत मध्ये नेऊन अत्याचार केला.
या घटनेची माहिती होताच पिढीत बालीकेच्या आईने पोलीस स्टेशन भिसी येथे जाऊन तक्रारार दिली,असता पोलीसांनी आरोपी अरविंद हरिदास नगराळे वय ४० वर्षे यांचे विरूद्ध कलम ६४,६४ (२) (आय), ६४(२), (जे) बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियम- सहकलम ४,८ पाक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. परंतू अशा असामाजिक घटना घडू नये व आरोपीस कठोर सजा देऊन फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी आज सर्व भिसी वासीय जनतेच्या वतीने काळ्या फिती बांधून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते हा मूक मोर्चा श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी येथून निघत पोलीस स्टेशन भिसी येथे येऊन धडकला या मोर्चामध्ये भिसी येथील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.