जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ :- केळापूर तालुका येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळा येथे दिनांक १०/०२/२०२५ रोजी सेंट्रम फाउंडेशन,युनिटी स्माॅल फायनान्स बॅंक आणि मेरा जीवन एक कलश पाणी मुंबई तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना बंकबेड वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक कवीवर विसुभाऊ बापट,प्रमुख अतिथी आशिषजी घाटोड साहेब (शाखाधिकारी युनिटी स्माॅल फायनान्स बॅक नागपूर),श्री दत्ताभाऊ सिडाम साहेब (सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई),सौ.मुक्ताताई सिडाम, सचिन दादा घोंगटे (सचिव श्री गाडगे महाराज मिशन मुंबई) व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा,कर्मयोगी श्री गाडगेबाबा व स्व.बापू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना बंकबेड चे हस्तातंर करण्यात आले.
संस्थेचे सचिव सचिन दादा घोंगटे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक व संस्थेचे,शाळेचा परिचय श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे सचिव व आमचे संचालक सचिन दादा घोगंटे साहेब यांनी करून दिला त्यानंतर कवीवर्य विसुभाऊ बापट यांनी विद्यार्थ्यांना कवितेतुन व मार्गदर्शनातून मंत्रमुग्ध केले. आशिषजी घाटोड साहेब (शाखाधिकारी युनिटी स्माॅल फायनान्स बॅक नागपूर)यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक मेटांगे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक मुख्याध्यापक पाटील सर यांनी केले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.