Breaking News

शहरातील बहुतांश अतिक्रमण निघाले रस्त्यावर आलेल्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय ??

 

प्रशासनानाला जाब विचारणार कोण ??रस्त्याच्या मापात पाप (धनदांडगे 12 मीटर गरीब 15 मीटर) होणार नाही याची खात्री कोण देणार ??

अविनाश देशमुख शेवगांव  9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमणाला 50 ते साठ वर्षांचा इतिहास त्यात शेवगांव शहरातील अनेक सो कॉल्ड गांव पुढारी यांच्या स्वतःच्या टपऱ्या मग त्याच्या चेल्या चपाट्यांच्या टपऱ्या मग त्याचे पोट भाडेकरू सगळं गचाळ अर्थकारण शहरातील तत्कालिण ग्रामपंचायत काळात शहरातील सर्व मोक्याच्या आणि शासनाच्या मालकीच्या जागेवर राजकारणी पुढारी आणि गावगुंडाचे अतिक्रमण याला जानू शहरात राजपत्रच मिळाल्या सारखे या सर्वांचा कडेलोट झाला शहरात भाजी बाजार रस्त्यावर प्रमुख राज्य महामार्ग आणि बाजारपेठ अरुंद त्यामळे कायम ट्राफिक जाम त्यात काहींनी वर्षानुवर्षे धंदा करून बंगले बांधले गाड्या घेतल्या‌.

पण आपल्या हक्काच्या व्यवसायासाठी दहा बाय दहाचा गाळा स्वतःच्या हक्काच्या जागेत घेतला नाही रस्त्याच्या गटारीवर टपरी त्याच्या पुढे बाकडे आणि त्याच्या पुढे दुकानाचा नावाचा बाण असलेला बोर्ड चुकुन गाडी दुकानासमोर लावली तर गाडी लावणाऱ्याच्या खानदानाचा उद्धार या मुळे सतत अतिक्रमण धारक आणि शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि बाहेरगावचे प्रवासी यांच्यात वाद होत असत प्रशासनाच्या एका मोठ्या राज्यस्तरीय निर्णयाने अखेर बेंड फुटले शेवगावच्या या गंभीर समस्येवर अतिक्रम हटाव या गोंडस नावाखाली आक्खी बाजारपेठांच भुई सपाट केली परंतु प्रश्न विस्थापित झालेल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा निर्माण झाला आहे.

तो कोण केव्हा आणि कसा सोडवणार ??? या काळात सगळ्यांचेच पितळ उघडे पडले गेल्या पंधरा दिवसात सर्व पक्षीय कार्यकत्यांना त्यांच्या नेत्याचे खरे रूप कळले. नवीनच राजकारणात आलेले काही गांव पुढारी आपल्या धन दांडग्या मित्रांचे अतिक्रमण { देऊन घेऊन } वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना सगळं गांव उघड्या डोळ्यांनी पाहत होत. विद्यमान लोकप्रतिनिधी आपल्या चेल्या चपाट्यांच्या टपऱ्या वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना सतत फोन करताना दिसत होते. आणि तेच लोकप्रतिनिधी पक्षातील जुन्या कार्यकत्यांचे फोन मात्र घेत नव्हते. पण म्हणतात ना “हमाम मे सब नंगे होते है” याचा प्रत्यय सगळ्या साहारातील व्यापाऱ्यांना आला. पुढच्यास ठेच मागचा शहाणा शहरातील इतर भागात अतिक्रमणात असलेल्या व्यापाऱ्यांनी तरी आता अक्कल विकत घेणे गरजेचे आहे.

*ताजा कलम*

तालुक्याचे विद्यमान आमदार जिल्ह्याचे खासदार पालकमंत्री आणि माजी खासदार शेवगावची बाजारपेठ उध्वस्त होत असताना नॉट रिचेबल मग आता अतिक्रमणधारकांचा वाली कोण ??? शहरातील अनेक शासकीय जागांवर पुनर्वसन होऊ शकते पण ते करणार कोण ??? ( बी.ओ.टी तत्ववार बांधा वापरा आणि हस्तातरीत करा यात परत गरीब व्यापारी पुन्हा भरडला जाईल व ते या गाळ्यांपासून वंचित राहतील पुढील पर्यायी जागांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा 1) जि. प. प्राथमिक शाळा मुले 2) कोरोनेशन हॉल 3) जुने तहसील कार्यालय सध्याचे पोलीस स्टेशन आणि शेजारील पोलीस कॉलनी 4) जुना सरकारी दवाखाना P.H.C. 5) जुने चिरफाड केंद्र 6 ) कोंडवाडा आणि लक्ष्मी लॉज 7) जुने बाजारतळ बैल पोळा जागा 8) पंचायतसमिती परिसर 9) शहरातील गावठांण च्या सुमारे 65 मोकळ्या जागा ( ज्या आता अनेक मोठ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात आहेत ) 10) जुने PWD ऑफिस 11) नवीन बाजारतळ परिसर 12 ) 1983 च्या DP प्लॅन मधील आरक्षित जागा ज्या आता गावपुढाऱ्यानी दाबल्या 13) शेतकरी भवन ची बखळ जागा 14) वल्लभदास ट्रष्ट धर्मशाळा 15) श्रीराम मंदिर ट्रष्ट ची जागा 16) भूदान चळवळीत दान दिल्या गेलेल्या जागा 17) जुनी कोर्ट इमारत 18) विविध कार्यकारी सोसायटी शेवगांव ची मोकळी बखळ जागा 19) कोर्टात वादात असलेला जुना डाक बंगला 20) खासगी गृह निर्माण सोसायट्यांच्या ओपन प्लेस ( Open to Sky ) जे आता राजकारण्यांनी गडप केले आहेत शहरातील अतिक्रमणात दुकान गेलेल्या काही जणांनी आपलं अतिक्रमण हटल्याने “नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे” अश्या भूमिकेत आहेत पण या व्यापाऱ्यांच्या मढ्यावर आयुष्यभर आपल्या राजकानाची पोळी भाजणारे कुठल्या बिळात जाऊन बसलेत ?? “तु टाक टपरी मी आहे तुझ्या माग कोण आडवं येत त्याला मी बघतो” मानसिकतेचे अनेक गब्बर लोक शहरात आहेत त्यांचा बंदोबस्त एका झटक्यात झाला शेवगांव असं पहिलं शहर असेल ज्याचे स्वतःचे कार्यालय नाही आणि त्यांनी एकही शॉपिंग कॉम्पलेक्स बांधले नाही याला जबाबदार कोण ???.

*नगरपरिषद हद्दीतील सर्व ईतर सरकारी विभागांच्या व महामंडळाच्या जागा व राजकारणी लोकांनी वेवेगवेगळे कारण सांगुन ताब्यात ठेवलेल्या ताब्यात घेऊन त्याचा विकास करून गोरगरीब व्यापाऱ्यांना फुकट वाटायला पाहिजे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बनावट दारूच्या विरोधात सतत च्या मालिकेनंतर एक्साईज डिपार्टमेंट ची शेवगांव शहरातील अनेक परमिट रूमवर धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने …

चोपडा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ मासीक मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- दिनांक 16/05/2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved