jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/सिंदेवाही :- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक २४/२/२०२५ रोजी रत्नापूर येथील फिर्यादी यांची अल्पवयीन पिडीत मुलगी खेळत असताना तिला घरात नेऊन आरोपी नामे किशोर मधुकर वय २८ वर्ष रा. रत्नापूर तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पो. स्टे. सिंदेवाही येथे अपराध क्र. ५३/२०२५ कलम ६५ (२) सह कलम ४,१२ पोस्को अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. ब्रम्हपुरी, पो. नि. विजय राठोड सा. ठाणेदार पो.स्टे. सिंदेवाही, यांचे मार्गदर्शनात पोउपनि. प्रेमनाथ ठवकर, नापोअ. नारायण येगेवार ब.नं. २४८१ मपोअ. शुभांगी भांडेकर ब. नं. १६८५ पो.स्टे. सिंदेवाही हे करीत आहेत.