jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” खुलेआम रेती घाटावर माफियांचा हैदोस “
” रेती तस्करांची चांदीच चांदी “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगाव, पिपर्डा येथील उमा नदीघाटावर मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या रेतीची तस्करी जोमात सुरू आहे. रेती तस्कर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेतीची तस्करी करीत आहे. गुरुवारी रात्रीच्या अंधारात २० ते २५ हमालांकडून नदीघाटातून रेतीचे उत्खनन व तस्करी सुरू असताना व ट्रॅक्टरमध्ये रेती भरत असताना नदीपात्रात अचानकपणे प्रवेश करीत पट्टेदार वाघाने डरकाळी फोडली असून हमालांवर हल्ला केला. वाघ हमालाच्या नरडीचा घोट घेण्याच्या तयारीत असताना नदीमध्ये रेतीची वाहतूक वाहणारे ट्रॅक्टर आले व ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने वाघाने येथून पळ काढीत जंगलाच्या दिशेने पलायन केले.
ट्रॅक्टर आल्याचे पाहून काही हमालांनी ट्रॉलीमध्ये उडी घेऊन आसरा घेतला तर काही हमालांनी थेट पळसगाव गाठले. घडलेल्या प्रकाराची गावामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. वाघाच्या हल्ल्यानंतर रेती तस्करांची जेसीबी नदीपात्रात उतरली असून, त्या माध्यमातून तस्करी केली जात आहे. नदीघाटाचा परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांचा या परिसरात वावर असतो. उमा नदीतील पाणी पिण्यासाठी वन्यजीव येत असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची हमालांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे.