खामगांव : – महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य मुजफ्फर हुसैन हे नागपूरला जात असतांना त्यांनी शनिवार दि.27 जून 2020 रोजी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांचेशी काॅंग्रेसच्या पक्ष संघटनेबदद्ल माहिती जाणुन घेतली. सानंदांच्या नेतृत्वात काॅंग्रेस संघठन मजबुत असल्याचे गौरवोद्गार यावेळी मुजफ्फर हुसैन यांनी काढले.
याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थित काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा मुजफ्फर हुसैन यांचेशी परिचय करुन दिला. कार्यकत्र्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करुन गुलाब पुष्प देउन मुजफ्फर हुसैन यांचे स्वागत केले. याप्रसंगी अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष बबलु पठान, नगरसेवक इब्राहिम खाॅ सुभान खाॅं, नगरसेवक शेख फारुख बिसमिल्ला, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल, जसवंतसिंग शिख, रवि पाटील,माजी नगरसेवक कमरु जम्मा, माजी नगरसेवक मो.नईम, शेख उस्मान, हाफीज साहेब, काकु पठान, राजु पटेल, गुडडु मिरचीवाला, सजनपुरी ग्राम पंचायत सदस्य सैयद बबलु यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. चहापान केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य मुजफ्फर हुसैन हे नागपूरसाठी रवाना झाले.
Check Also
चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा
एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन. आगामी चिमूर नप निवडणूक वर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा. …
उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी
8 रुग्णांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविले पालकमंत्र्यांचे जबाबदार व्यक्तींवर कारवाईचे निर्देश वर्धा दि …