Related Articles

नाशिक – प्रतिनिधी
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी सकाळी ११ वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ४३ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरानामुळे २१५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण –
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६५, चांदवड ०८, सिन्नर ३९, दिंडोरी १७, निफाड ४८, नांदगांव १३, येवला ३८, त्र्यंबकेश्वर १०, बागलाण ०८, इगतपुरी २५, मालेगांव ग्रामीण १२ असे एकूण २८३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा, देवळा, पेठ, कळवण या चार तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४१ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५१ तर जिल्ह्याबाहेरील ४० असे एकूण १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७७३ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू नाशिक महानगरपालिका क्षेत्रात (९२) झाले असून, नाशिक ग्रामीण ३९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७३ व जिल्हा बाहेरील ११ अशा एकूण २१५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.