Breaking News

चिमूर पोलिसांनी 52,000 रुपयेच्या मुद्देमालासह आरोपीस केले अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील स्वामी विवेकानंद आयटीआय येथे दि 4/9/20 ते 5/9/20 चे रात्रौ दरम्यान आत प्रवेश करून अज्ञात आरोपितांनी संगणक, प्रिंटर व इतर साहित्य की. 52000 रु चा मुद्देमाल चोरी करून नेल्याचे फिर्यादी कुंदन तपासे यांनी रिपोर्ट दिली असता पोलीस स्टेशन चिमूर येथील ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी चिमूर भागात आपली गोपनीय यंत्रणा राबवून चिमूर येथील आरोपी सौरभ मनोहर चांदेकर वय 20 वर्ष, प्रतीक ताराचंद मत्ते वय 21 वर्ष, स्वप्नील रामकृष्ण बंडे वय 23 वर्ष सर्व रा चिमूर याना ताब्यात घेऊन कसोशीने व चाणाक्ष बुद्धीचा वापर करून सर्वाना विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल 2 संगणक व 3 प्रिंटर की 52000 रु चा जप्त करण्यात आला.

सदरची कारवाही मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांचे मार्गदर्शनात पोनी स्वप्नील धुळे, पोहवा विलास निमगडे , सचिन खामनकर, सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, सतीश झिलपे यांनी पार पाडली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved