Breaking News

वेबसाईट डेव्हलपरचा रात्रीस ‘लाइव्ह’ चालेत ‘अद्भूत’पूर्ण भुलभुलैय्या

वाचकहो,
पत्रकारांना खोट्या भुलथापा देऊन पोर्टल बनवून देण्याच्या नावाखाली भ्रामक कल्पना पसरवून लुबाडणूक करणा-या कन्सल्टन्सीचा खरा चेहरा आता ङिजिटल मीङियातून पुढे येऊ लागला आहे.

महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या वेबसाईट ङेव्हलपरकडून एक वेगळ्याच प्रकारे पत्रकारितेत येऊ पाहणाऱ्या नवख्या व्यक्तीसाठी भुलभुलैय्या नावाचा सुळसुळाट सुरु झाला आहे. वास्तविक सोशल मीडियावर वेब पोर्टल,यु-टुयूब चँनल्स बनविणे आणि त्याव्दारे जलदगतीने बातम्या प्रसारीत करणे ही काळाची गरज निर्माण झालेली असली तरी, काही भडभुंजानी मात्र नवख्या पत्रकारितेत येऊ पाहणाऱ्या व्यक्तीचा अज्ञान पणाचा फायदा उठवत स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी वेब पोर्टल नावाचा एक वेगळाच धंदा मांडून ठेवला आहे.

वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभने,आमिषे दाखवून जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे म्हणून काही वेब पोर्टल बनविणा-या चालकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे.त्यामुळे सामान्य व्यक्ती सैरभैर झालेला आहे.

एखाद्या वेश्येने भडक कपडे अंगावर परिधान करुन ग्राहकांना भुलविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे अंगविक्षेप करुन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करावे, तसाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रात वेब पोर्टल बनविणा-या काही कन्सल्टन्सी (दलाल) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेबसाईट ङेव्हलपरने सुरु केला आहे. या वेब पोर्टल बनवून देणाऱ्या कन्सल्टन्सीकङून एकदा का वेब पोर्टल बनविण्याची संपूर्ण रक्कम वसूल झाली की, मग ते आँनलाईन वेब पोर्टल सुरु आहे किंवा बंद पडले याचेशी त्याचे काही एक देणे घेणे नसते, महत्त्वाचा असतो तो फक्त धंदा…..! त्यावेळी मात्र 5000 रुपये देऊन वेबसाइट बनविलेल्या गरिब लोकांची फसगत होते.

◼️रात्रीस लाइव्ह चाले

आजकाल प्रिंन्ट मिडीयात असलेली बरीच मंडळी आँनलाईन व काळाची गरज ओळखून वेब पोर्टल बनविण्यासाठी जास्त धडपडत असताना दिसतात. मात्र त्यांना सखोल माहिती देऊन किंवा गुगल सारख्या जागतिक पातळीवरच्या कंपन्याकडून वेब पोर्टल चालविणा-या संपादकाना काय आर्थिक फायदा होऊ शकतो. हे फक्त सखोलपणाने एखादाच “देव” माणूस ज्यावेळेस प्रामाणिकपणाने समजावून सांगतो. त्यावेळी मात्र वेब पोर्टल बनवून देण्याच्या नावाखाली दुकान मांडून बसलेल्यांच्या पोटात पोटशुळ उठतो आणि असले हे वेब पोर्टलच्या नावाखाली अद्भूतपूर्ण लुटमारीचे प्रकार महाराष्ट्रात सध्या फोफावत चाललेत ही मोठी शोकांतिका आहे.

आम्ही बनवितो तेच खरे पोर्टल असून, बाकीचे बोगस असल्याचा बनाव रात्रीस खेळ चालेतील लाइव्ह मार्गदर्शन कार्यक्रमात केला जातो आणि भूताने पछाङल्यात भानामतीत हरपलेले त्याचे अंधभक्त पोर्टलचे संपादक कमेंटच्या माध्यमातून माना हालवत असतात. लाइव्हमध्ये मधातच कुणाचा तरी फोन येतो. हॅलो, नमस्कार! मी लाईव्ह आहे. युट्युबवर या फेसबूकवर या… म्हणीत लाइव्ह कार्यक्रमात आपल्याला किती फोन येतात, हे दाखविण्याचा प्रयत्न करतो. मधातच विषंयातरण होते. मग, पोर्टल संघटनेचा विषय येतो. बनवा बनवी सुरू होते. शासनस्तरावरील बातेबंबाल गोष्टी सुरू होतात आणि रात्रीचे प्रवचन ऐकून अंधभक्त पोर्टलचे संपादक दुस-या दिवशीच्या सूर्याची वाट बघत उद्याच आपल्याला लाखोंचा फायदा होणार अशा स्वप्नात बिचारे ङोळे चोळत उठतात.
गुगलच्या जाहिरातीच्या माध्यमातून आधी लाखोंची कमाई करून देऊ अशा थापा मारल्या आणि आता हाच ङेव्हलपर गुगल अङसन्स लाऊन फायदा काय, किती पैसे मिळतात, अशी भाषा करू लागला आहे.

◼️ टीआरपीसारखी veiwer वाढीचा घोटाळा

या नामांकित वेबसाइट ङेव्हलपरने काही वेबसाइटधारकांना आपल्याच मर्जीने veiwer वाढवून देण्याचा धंदाच सुरू केला होता. एक दोन आकङे नव्हेतर चक्क एक कोटी 25 लाख वाचक झाल्याचे भासवून महाब्लाॅस्ट करण्यात आला. रातोरात ईतकी वाचक संख्या झाल्याचे बघून पोर्टलच्या संपादकाचा अदभुतपूर्ण आनंद गगनात मावेनासा झाला होता. वाचकांनाही तोंङात बोट घालण्याची वेळ आली. हा चमत्कार झाला तरी कसा? प्रश्नच पङला आणि या अद्वभूत रहस्याचे गुपीत उघङे पङले. संपादक लोक आणि वाचकांच्या मनात फेकू पाहणारा हा खरा ॲङमीन जगासमोर आलाय.

◼️ तक्रारी

वेबसाईट बनविणारे ग्राहक शोधण्यासाठी हा कन्सल्टन्सीवाला बहुरुपी आहे. तो कधी वकिल बनतो, तर तो कधी पत्रकार. कधी पोर्टल संघटनेचा अध्यक्ष. वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होतो. तिथून पत्रकार शोधतो. पोर्टल बनविल्यानंतर कसे आर्थिक फायदे होतील, याचे स्वप्न दाखवितो. मग, कमी पैशाची ऑफर देतो. कधी कधी तर दोन हजारांतही तयार होतो. एखदा का ग्राहक हेरला, त्यावर अद्भूत अशी भानमती करतो. खात्यात पैसे जमा होइस्तोवर तो इतका गोङ बोलतो की आयुष्यात तो व्यक्ती तुम्हाला भेटून धन्य झालात. पण, अवघ्या दोन तीन महिन्यातच वेबसाइट आणि कन्सल्टन्सीवाला आपली जादू दाखवितो. तेव्हा एखाद्या बाबाने तुमच्यावर मौनी टाकून पसार झाल्याचे धान्यात येते आणि रात्री लाइव्ह चालणा-या बाबानं आपली वाट लावली हे लक्षात येते. वेबसाइट बनविल्यावर मूळ ङिझाइनच्या बातम्या देखील ङिलिट मारून देण्याची तसदी घेत नाही. जाहिराती लाऊन देत नाही. इतकेच काय पोर्टलचे लोगो, हेङर देखील लाऊन देत नाही. एसएसएल करून दिलं जात नाही. फक्त संघटनेचे ॲङमीन होण्यावर हट्ट धरला जातो. महाराष्ट्रात शेकङो जणांचे पैसे बुङाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. देशभरातील सर्वात मोठं नेटवर्क सांगाणा-या या थापेबाजाच्या अनेक वेबसाइट बंद आहेत. हा महाशय उद्योग आधार नोंदणीच्या नावावरही लुटत आहे.

◼️आवाहन

आम्ही ज्यावेळेस “युवा मराठा” आँनलाईन वेब पोर्टल व यु-टुयुब चँनल्सची स्थापना करण्यासाठी धडपड सुरु केली. त्यावेळी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधून माहिती घेतली तर आम्हांला प्रकर्षाने एक जाणवले की,आँनलाईन चँनल्स व पोर्टल बनवून देण्याच्या नावाखाली अक्षरशः मोठाच धंदा मांडला गेला आहे.सखोल अभ्यासाअंती आमचे आँनलाईन वेब न्युज चँनल्स अगदी अल्पदरात सुरु करण्यात आम्ही व्यशस्वी ठरलो आहोत.

वास्तविक आँनलाईन वेब पोर्टलस् व यु-टुयूब चँनल्स डिजीटिल इंडीयाच्या मार्गावरील भविष्यातील शासन दप्तरी नोंद घेण्यासारखी प्रसार माध्यमातील साधने म्हणून जरी आज झटत असलीत तरी मात्र या आँनलाईन सोशल मिडीयावरील प्रसारमाध्यंमाना शासनाकडून अद्याप तरी शासकीय जाहिरातीचा पुरवठा करण्या विषयीचा ठोस असा काही निर्णयच नाही, तरीदेखील सध्या महाराष्ट्रात बनवाबनवीचा भुलभुलैय्याचा खेळ सर्रासपणे खेळला जातोय.

आम्ही सन २००३पासून “युवा मराठा” वृतपत्राच्या माध्यमातून पत्रकारिता करत असताना आणि शासनाचा निर्णय अध्यादेश परिपत्रक असतानाही अजून तरी “क” वर्गातील वृतपत्रांना शासकीय जाहिरातीच मिळालेल्या नाहीत. मग या वेब पोर्टलना शासन जाहिराती तरी नेमक्या कोणत्या आधारावर देणार आहे. हा सगळा मोठाच झोल आह.,एक मात्र खरे की, सध्या तरी वेब पोर्टलधारक संपादकाना गुगल अँडसन कडून मिळत असलेली थोडी फार रक्कम हिच खरं तर आपली सक्षम बाजू आहे,जगदगुरु तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगावयाचे झाले तर आम्ही येथे एवढेच सांगू शकतो. “ठेविले अनंते तैसेची रहावे, चिती असू द्यावे समाधान” कुठल्याही भुलभुलैय्याला बळी पडण्यापुर्वी एकदा निश्चितच आम्हांला संपर्क साधा ” युवा मराठा”सदैव आपल्यासोबतच आहे. चांगल्या कामासाठी! सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी यासोबतच.एवढेच!

राजेंद्र पाटील राऊत
9923362030

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी

8 रुग्णांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविले पालकमंत्र्यांचे जबाबदार व्यक्तींवर कारवाईचे निर्देश वर्धा दि …

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved